न केलेल्या गुन्ह्यासाठी २५ वर्ष होता तुरुंगात, भरपाई म्हणून मिळाले ४.७ कोटी रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 01:17 PM2019-01-08T13:17:13+5:302019-01-08T13:18:06+5:30

जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात अशी अनेक लोकं आहेत, जे निर्दोष असूनही त्यांनी तरुंगात अनेक वर्ष घालवली आहेत.

Chinese man compensated 4.7 crore rupees for being wrongly jailed for 25 years | न केलेल्या गुन्ह्यासाठी २५ वर्ष होता तुरुंगात, भरपाई म्हणून मिळाले ४.७ कोटी रुपये!

न केलेल्या गुन्ह्यासाठी २५ वर्ष होता तुरुंगात, भरपाई म्हणून मिळाले ४.७ कोटी रुपये!

googlenewsNext

(Image Credit : The Hacker News)

जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात अशी अनेक लोकं आहेत, जे निर्दोष असूनही त्यांनी तरुंगात अनेक वर्ष घालवली आहेत. अशाच एका व्यक्तीचं नाव आहे लियु झोंगलिन.  लियु हा चीनचा आहे. त्याला १८ वर्षाच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी २५ वर्षांची शिक्षा झाली होती. पण जेव्हा हे कळालं की, तो निर्दोष होता, तेव्हा सरकारने त्याला भरपाई म्हणून ४.७ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. 

चुकीच्या आरोपामुळे लियु याला त्याच्या आयुष्यातील ९, २१७ दिवस तरुंगात घालवावी लागलीत. याप्रकरणी कोर्टाने लियु झोंगलिनला ४.६ मिनियन युआन(४.७ कोटी रुपये) इतकी भरपाई देण्याचा आदेश दिला होता. ही घटना १९९० मध्ये घडली होती. गावातील व्यक्तीला एका शेतात एक महिलेचा मृतदेह आढळता होता. या हत्येप्रकरणी लियु संशयित होता. नंतर तो याप्रकरणी दोषीही ठरला. त्यावेळी त्याचं वय २२ वर्ष होतं, आता तो ५० वर्षांचा झाला आहे. 

१९९४ मध्ये कोर्टाने लियुची मृत्यूदंडाची शिक्षा बर्खास्त केली होती. त्यानंतर लियुला २०१६ मध्ये सोडण्यात आले. त्याला ठोठावण्यात आलेल्या २५ वर्षांच्या शिक्षेचा निर्णय कोर्टाने २०१८ मध्ये मागे घेतला. त्यावेळी कोर्टाने सांगितले की, लियु याला देण्यात आलेली शिक्षा ही अस्पष्ट तथ्यांच्य आणि अपुऱ्या साक्षिदारांवर आधारित होती.    

Web Title: Chinese man compensated 4.7 crore rupees for being wrongly jailed for 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.