घ्या! पाळण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर केला होता किंग कोब्रा, घरी आल्यावर जे झालं ते वाचून अवाक् व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 04:36 PM2021-06-04T16:36:05+5:302021-06-04T16:37:54+5:30

काही लोक तर घरात सापही पाळतात. चीनमध्ये तर एक व्यक्ती कोब्रा साप पाळण्याच्या तयारीत होता. त्याने साप ऑर्डरही केला. पण झालं भलतंच.

Chinese man buys detoxified cobra to pet it but almost gets killed after the snake bites him | घ्या! पाळण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर केला होता किंग कोब्रा, घरी आल्यावर जे झालं ते वाचून अवाक् व्हाल...

घ्या! पाळण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर केला होता किंग कोब्रा, घरी आल्यावर जे झालं ते वाचून अवाक् व्हाल...

Next

काही लोकांचं प्राण्यांवर खूपच प्रेम असतं. अशा लोकांना प्राण्यासोबत राहण्याची फारच आवड असते. इतकंच नाही तर ते प्राण्यांना आपल्या परिवारातील सदस्यांप्रमाणे वागवतात. तुम्ही अनेकांना कुत्रा, मांजर, सशे, पोपट आपल्या घरात पाळताना पाहिलं असेल. काही लोक तर घरात सापही पाळतात. चीनमध्ये तर एक व्यक्ती कोब्रा साप पाळण्याच्या तयारीत होता. त्याने साप ऑर्डरही केला. पण झालं भलतंच.

चीनच्या Heilongjiang प्रांतात राहणाऱ्या एका व्यक्तीचं सापावर इतकं प्रेम होतं की, त्या पाळण्याच्या उद्देशाने विषारी नसलेला किंग कोब्रा साप ऑनलाइन ऑर्डरही केला. पण चुकून त्याच्या घरी विषारी किंग कोब्रा सापाची डिलीव्हरी झाली. त्यानंतर जे झालं ते अंगावर शहारे आणणारं आहे. (हे पण बघा : VIDEO : लॅम्बॉर्गिनी कारच्या सायलेन्सरवर शिजवत होता 'कबाब', नंतर जे झालं ते बघतच रहाल....)

या व्यक्तीचं सापवरील प्रेम त्याचा जीव घेणार होतं. या व्यक्तीने मोठ्या उत्साहाने पाळण्यासाठी एक एक मीटर लांब विना विषारी किंग कोब्रा ऑनलाइन ऑर्डर केली. पण चुकून त्याच्या घरी विषारी किंग कोब्रा साप पाठवण्यात आल्यावर एकच गोंधळ उडाला. (हे पण वाचा : फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला अन् टॉयलेट सीटवर फणा काढून बसलेला दिसला कोब्रा आणि मग....)

घरात किंग कोब्रा साप असूनही ही व्यक्ती तो विषारी नसल्याचं समजून बिनधास्त झोपली होती. तेव्हा अचानक सापाने त्याच्या पायावर दंश मारला. ज्यानंतर या व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल. उपचार करताना डॉक्टरही हैराण झाले. कारण साप विषारी होता आणि या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी जराही उशीर झाला असता तर त्याची जीव गेला असता. 

या सापाचं विष फारच घातक होतं. मात्र, त्याला वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याने या साप प्रेमीचा जीव वाचवण्यात यश आलं. जेथून हा साप ऑर्डर केला होता ते म्हणाले की, ते विषारी सापांच विष काढून विकतात. जेणेकरून कुणाला काही नुकसान पोहोचू नये. पण यावेळी त्यांच्याकडून मोठी चूक झाली. ज्यासाठी त्यांनी माफी मागितली.
 

Web Title: Chinese man buys detoxified cobra to pet it but almost gets killed after the snake bites him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.