जगात कुठे पांडा जन्मला तर चीनचाच असतो मालकी हक्क, पण असं का? पाहा काय आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:33 IST2025-10-23T12:32:16+5:302025-10-23T12:33:32+5:30
China Panda Ownership : जगातील कोणत्याही देशात पांडा जन्मला तरी, त्याचा मालकीहक्क चीनकडेच असतो! याचं नेमकं कारण काय हेच आपण जाणून घेणार आहोत.

जगात कुठे पांडा जन्मला तर चीनचाच असतो मालकी हक्क, पण असं का? पाहा काय आहे कारण...
China Panda Ownership : चीनमधील पांडा प्राणी इतके क्यूट आणि आकर्षक दिसतात की, कुणालाही आवडतील. लहान मुलांमध्ये तर पांडाची खूपच क्रेझ असते. गुबगुबीत अशा या पांडाना मस्ती करताना बघणं देखील फार मजेशीर असतं. सामान्यपणे पांडा चीनमध्ये सगळ्यात जास्त आढळतात. पांडा दुर्मिळही आहेत. म्हणूनच जगभरातील प्राणी संग्रहालयांमध्ये त्यांची खास काळजी घेतली जाते. पण पांडाविषयी एक अनोखी बाब आपल्याला माहीत नसेल. ती म्हणजे जगातील कोणत्याही देशात पांडा जन्मला तरी, त्याचा मालकीहक्क चीनकडेच असतो! याचं नेमकं कारण काय हेच आपण जाणून घेणार आहोत.
आपल्याला वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल की, जगभरातील जवळपास सर्व पांडा चीनच्या मालकीचे मानले जातात. यामागे आहे चीनची खास "पांडा पॉलिसी". जी केवळ पांड्यांच्या व्यवस्थापनासाठीच नव्हे, तर चीनच्या "सॉफ्ट पॉवर" आणि जागतिक राजनैतिक संबंधांचा एक महत्त्वाचा भाग आहे.
आधी भेटवस्तू म्हणून दिले जात होते
खरंतर चीनच्या या धोरणाची सुरुवात 1950 च्या दशकात झाली, जेव्हा चीनने पांडा इतर देशांना 'राजनैतिक भेट' म्हणून देण्यास सुरुवात केली. हे मैत्री आणि शुभेच्छांचे प्रतीक मानले जात असे.
पण पुढे 1980 च्या दशकात पांडा "Endangered Species" झाले आणि त्यांच्या व्यापारावर आंतरराष्ट्रीय बंदी आली. त्यानंतर चीनने ही नीति बदलली. आता चीन इतर देशांना पांडा भेट देण्याऐवजी "भाड्याने देण्याची" देऊ लागले. म्हणजेच, चीन कोणत्याही देशाला ठराविक कालावधीसाठी पांडा उधार देतो.
कशी आहे ही पॉलिसी?
चीनचा मालकीहक्क का?
चीनचा स्पष्ट दावा आहे की जगातील प्रत्येक विशाल पांडा तो कुठेही जन्मलेला असो चीनचीच संपत्ती आहे. कारण हे प्राणी चीनच्या नैसर्गिक अधिवासातून उत्पन्न झाले आहेत.
संरक्षणावर भर
या धोरणामागील प्रमुख उद्देश पांड्यांचे संरक्षण आणि त्यांची संख्या वाढवणे हा आहे. चीन इतर देशांना पांडा "रिसर्च" आणि "प्रजनन अभ्यास" यासाठी देतो, ज्यामुळे या प्रजातीबद्दल अधिक वैज्ञानिक माहिती मिळते.
आर्थिक करार
पांडा लीजवर घेण्यासाठी देशांना चीनला दरवर्षी सुमारे १० ते २० लाख अमेरिकन डॉलर्स द्यावे लागतात. ही रक्कम थेट चीनच्या "पांडा कंझर्व्हेशन प्रोग्राम"मध्ये वापरली जाते.
‘पांडा डिप्लोमसी’
पांडा पॉलिसी फक्त संरक्षण किंवा पैशांसाठी नाही, तर ती चीनच्या कूटनीतीचं एक प्रभावी हत्यार आहे असं समजा. जेव्हा चीनला एखाद्या देशासोबत संबंध सुधारायचे असतात, तेव्हा चीन त्या देशाला पांडा "मैत्रीचं प्रतीक" म्हणून दिला जातो.