VIDEO : वैज्ञानिकांनी लॉन्च केलेल्या रॉकेटची झाली अशी अवस्था, जीव वाचवत पळत सुटले लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 15:29 IST2024-06-25T15:26:40+5:302024-06-25T15:29:13+5:30
स्पेस व्हेरिएबल ऑब्जेक्ट मॉनिटर सॅटेलाईट घेऊन जाणारं लॉन्ग मार्च सी२ रॉकेट २२ जूनला सकाळी ३ वाजता जिचंग सॅटेलाईट लॉन्च सेंटरवरून लॉन्च करण्यात आलं होतं.

VIDEO : वैज्ञानिकांनी लॉन्च केलेल्या रॉकेटची झाली अशी अवस्था, जीव वाचवत पळत सुटले लोक
गामा-रे स्फोटांचा अभ्यास करण्यासाठी चीन आणि फ्रान्स या दोन देशांनी संयुक्त विद्यमाने एक रॉकेट गेल्या शनिवारी लॉन्च केलं होतं. पण हे रॉकेट सामान्य लोकांसाठी धडकी भरवणारं ठरलं. स्पेस व्हेरिएबल ऑब्जेक्ट मॉनिटर सॅटेलाईट घेऊन जाणारं लॉन्ग मार्च सी२ रॉकेट २२ जूनला सकाळी ३ वाजता जिचंग सॅटेलाईट लॉन्च सेंटरवरून लॉन्च करण्यात आलं होतं.
चीन एअरोस्पेस सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने रॉकेटने उड्डाण घेतल्यावर लगेच यशस्वी झाल्याची घोषणा केली. पण अचानक या रॉकेटचा मलबा नागरी वस्तींमध्ये येऊन पडला.
🙀 Behind the scenes of SVOM launch https://t.co/Fcc0OAY3acpic.twitter.com/5fiM4oz2GY
— China 'N Asia Spaceflight 🚀𝕏 🛰️ (@CNSpaceflight) June 22, 2024
एसवीओएम, चीनचं राष्ट्रीय अंतराळ प्रशासन आणि फ्रान्सच्या सीएनईएसमधील एक प्रोजेक्ट आहे. ज्यात अॅडव्हांस सायंटिफिक पेलोडचा वापर करून गामा-रे स्फोटातून हाय एनर्जी इलोक्ट्रोमेग्नेटिक रेडिएशनची माहिती मिळवण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. पण इथे लोक मोठ्या संख्येने जीव मुठीत घेऊन धावताना दिसत आहेत.
China's National Asia Spaceflight ने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर लोक कमेंट्स करून आपला राग व्यक्त करत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की, आपण आधुनिक काळात अंतराळाच्या स्पर्धेत आहोत. चीन आपल्याच नागरीकांवर विषारी रॉकेट पाडत आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, हा रॉकेटवर खर्च झालेल्या पैशांचा मलबा आहे.