मित्राच्या वाढदिवशी तरूणानं इतक्या जोरात गायलं गाणं, गाता गाता फुप्फुस फुटलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 15:42 IST2021-12-18T15:42:10+5:302021-12-18T15:42:23+5:30
China Weird News : एका व्यक्तीने मित्राच्या वाढदिवशी गाणं गायला सुरूवात केली आणि सूर इतके वरचे लागले की, व्यक्तीचे फुप्फुसं गाणं गाताना पंक्चर झाले.

मित्राच्या वाढदिवशी तरूणानं इतक्या जोरात गायलं गाणं, गाता गाता फुप्फुस फुटलं!
माणूस जेव्हा खूप आनंदी असतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद जाहीर करत असतो. कुणी आनंदाने उड्या मारू लागतं तर कुणी आनंदाने नाचू लागतं. असाच आनंद चीनमध्ये (China) राहणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या मित्राच्या वाढदिवशी झाला होता. आनंद इतका जास्त झाला होता की तो त्याला चांगलाच महागात पडला. या व्यक्तीने मित्राच्या वाढदिवशी गाणं गायला सुरूवात केली आणि सूर इतके वरचे लागले की, व्यक्तीचे फुप्फुसं गाणं गाताना पंक्चर झाले.
Oddity Central मध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, या व्यक्तीचं नाव वांग जी आहे. वांग जी याला गाण्याचे वरचे सूर कॅच करणं चांगलंच महागात पडलं. ही व्यक्ती आपल्या मित्राची बर्थ डे पार्टी अटेंड करण्यासाठी गेली होती. तिथे त्याने गाणं गाण्याचा निर्णय घेतला. त्याने गाण्यासाठी “New Drunken Concubine” गाणं निवडलं. हे गाणं आपल्या उंच नोट आणि पिचसाठी ओळखलं जातं.
२५ वर्षीय या व्यक्तीने पार्टीत गाणं गायला सुरूवात केली. जेव्हा या गाण्यातील वरचा सूर आला, तेव्हाही ही व्यक्ती तो सूर कॅच करण्याचा प्रयत्न करत राहिला. यादरम्यान अचानक त्याच्या छातीत जोरात वेदना झाली. तरीही त्याने कसंतरी गाणं पूर्ण केलं. पार्टी संपवून तो घरी आला, घरी सतत त्याच्या छातीत दुखत होतं. सकाळी जेव्हा वेदना वाढल्या, तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये गेला.
डॉक्टरकडे गेल्यावर त्याचा एक्स-रे काढण्यात आला. या एक्स-रे च्या रिपोर्टने सर्वांनाच हैराण केलं. उंच सूरात गाण्यामुळे त्याची फुप्फुसं पंक्चर झाली होती. छिद्र झाल्याने त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. याला मेडिकल टर्मममध्ये pneumothorax असं म्हणतात. यात लंग्स आणि चेस्ट वॉलमधे बबल्स येतात. लगेच त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेने सर्वांनाच हैराण केलं आहे.