सफाई करताना अचानक सापडलं वडिलांचं ६२ वर्ष जुनं बॅंक पासबुक, मुलगा रातोरात बनला कोट्याधीश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:02 IST2025-12-17T12:52:25+5:302025-12-17T13:02:05+5:30
Viral News : तुम्ही कधी विचार केलाय का की साफसफाई करताना असं काही सापडेल की ज्यामुळे माणूस रातोरात कोट्यधीश बनेल? ऐकायला स्वप्नासारखं वाटतं, पण चिलीमधील एका व्यक्तीसोबत हे प्रत्यक्षात घडलं आहे.

सफाई करताना अचानक सापडलं वडिलांचं ६२ वर्ष जुनं बॅंक पासबुक, मुलगा रातोरात बनला कोट्याधीश
Viral News : कधी-कधी घराची साफसफाई करताना एखादी हरवलेली मौल्यवान वस्तू किंवा पैसे सापडले, तर क्षणात सगळा थकवा निघून जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की साफसफाई करताना असं काही सापडेल की ज्यामुळे माणूस रातोरात कोट्यधीश बनेल? ऐकायला स्वप्नासारखं वाटतं, पण चिलीमधील एका व्यक्तीसोबत हे प्रत्यक्षात घडलं आहे. चला जाणून घेऊया, साफसफाई करत करत हा माणूस कसा कोट्यधीश झाला.
कचऱ्याच्या डब्यात सापडलं बँकेचं पासबुक
चिलीतील एक्सेसिल हिनोजोसा या व्यक्तीचं नशीब तेव्हा फळफळलं, जेव्हा घराची साफसफाई करताना त्याला कचऱ्याच्या डब्यातून वडिलांची 62 वर्षे जुनं बँक पासबुक सापडलं. वडील आधीच वारले होते. पासबुक मिळाल्यानंतर एक्सेसिलने वडिलांच्या मेहनतीची कमाई परत मिळवण्यासाठी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
पासबुकमध्ये किती रक्कम होती?
मीडिया माहितीनुसार, एक्सेसिलच्या वडिलांनी 1960–70 च्या दशकात घर खरेदीसाठी सुमारे 1.4 लाख रुपये बँक खात्यात जमा केले होते. त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती. सफाईदरम्यान पासबुक कचऱ्यात सापडलं तेव्हा घरच्यांना ते काही फार महत्त्वाचं वाटलं नाही, कारण ती बँक आधीच बंद झाली होती आणि पासबुकवर घरातील कोणाचंही नाव नव्हतं.
‘स्टेट गॅरंटी’ने बदललं नशीब
मात्र पासबुकवर लिहिलेल्या एका शब्दाकडे एक्सेसिलचं लक्ष गेलं. 'स्टेट गॅरंटी'. याचा अर्थ, बँक दिवाळखोर झाली किंवा बंद पडली तर सरकार ठेवींची परतफेड करणार. ही माहिती समजताच एक्सेसिलने वडिलांची रक्कम व्याजासह परत मिळवण्याचा निर्णय घेतला. अखेर न्यायालयानेही त्याच्या बाजूने निर्णय देत, वडिलांची संपूर्ण रक्कम व्याजासह देण्याचे आदेश दिले.
1.4 लाखांचे झाले 9 कोटी!
सुमारे 62 वर्षांपूर्वी जमा केलेले 1.4 लाख रुपये आज तब्बल 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. अशा प्रकारे कचऱ्यात सापडलेल्या एका जुन्या पासबुकमुळे एक्सेसिल हिनोजोसा रातोरात कोट्यधीश झाला.