'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 12:17 IST2021-03-22T12:16:54+5:302021-03-22T12:17:11+5:30
लंडनमध्ये जेवढ्या किंमतीत ही पार्किंग स्पेस विकली जात आहे. तेवढ्या पैशात ब्रिटनच्या एखाद्या शहरात पार्किंगसोबत ३ बीएचके घर खरेदी केलं जाऊ शकतं.

'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट!
ब्रिटनमध्ये घराची सरासरी किंमत २ कोटी रूपये असते. पण ब्रिटनची राजधानी लंडनमद्ये कार पार्किंगची एक जागा २ कोटी ११ लाख रूपयांना विकली जात आहे. द सन च्या रिपोर्टनुसार, ही पार्किंग स्पेस हाइड पार्कमध्ये आहे आणि ऑक्सफोर्ड स्ट्रीटवर आहे.
लंडनमध्ये जेवढ्या किंमतीत ही पार्किंग स्पेस विकली जात आहे. तेवढ्या पैशात ब्रिटनच्या एखाद्या शहरात पार्किंगसोबत ३ बीएचके घर खरेदी केलं जाऊ शकतं. रिपोर्टनुसार, हाइड पार्क येथील पार्किंग स्पेस खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ही जागा ८५ वर्षांसाठी लीजवर दिली जाईल. खरेदीदाराला त्याची कार सिटी सेंटरमध्ये पार्क करावी लागणार नाही. ज्याने त्याची बचत होईल.
गर्दीच्या वेळी लंडनमध्ये कार पार्किंगसाठी जागा शोधणं फार अवघड असतं. मात्र, लंडनच्या हाइड पार्कमधील पार्किंग इतकी महाग विकली जाणं ही पहिली घटना नाही. काही महिन्यांपूर्वी लंडनजवळील शहर नाइट्सब्रिजमध्ये पार्किंगची एक जागा ३ कोटी ५१ लाख रूपयांना विकली जात होती. ब्रिटनमध्ये सर्वात महागडी पार्किंग जागा २०१४ मध्ये विकली गेली होती. त्यावेळी या पार्किंगची विक्री ४ कोटी रूपयात विकली जात.