मांजरीने वाचवला पायऱ्यावरुन पडणाऱ्या चिमुकल्याचा जीव, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 17:44 IST2021-10-03T17:43:43+5:302021-10-03T17:44:42+5:30

व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

cat saved the life of the baby who was almost fell down from stairs, watch the VIDEO | मांजरीने वाचवला पायऱ्यावरुन पडणाऱ्या चिमुकल्याचा जीव, पाहा VIDEO

मांजरीने वाचवला पायऱ्यावरुन पडणाऱ्या चिमुकल्याचा जीव, पाहा VIDEO

मांजर हा पाळीव प्राणी असून, अनेकजण आपल्या घरात मांजर पाळतात. अनेकदा सोशल मीडियावर मांजरीचे अनेक व्हिडिओही व्हायरल होतात. नेहमी प्रमाणे आताही मंजरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. व्हिडिओमध्ये मांजर एका चिमुकल्याला पायऱ्यावरुन पडण्यापासून वाचवताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका खोलीत एक लहान बाळ खेळत आहे. त्या खोलीत घरातील पाळीव मांजरदेखील आहे. खेळता-खेळताना चिमुकला अचानक पायऱ्यांकडे जाऊ लागतो. तेवढ्यात सोफ्यावर बसलेली मांजर अचानक येते आणि त्या बाळाला खाली पडण्यासापासून वाचवते. हा व्हिडिओ जुना असला तरी सध्या तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण मांजरीचे कौतुक करत आहे. हा व्हायरल व्हिडिओ media flyguynew1 नावाच्या ट्विटर युझरने सोशल मीडियावर शेअर केला असून, आतापर्यंत 9 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. 

Web Title: cat saved the life of the baby who was almost fell down from stairs, watch the VIDEO