सरळ नव्हे तर उलटी चालते ही कार, विचित्र डिझाइन पाहून तुमचाही उडेल गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 18:23 IST2021-08-23T18:21:11+5:302021-08-23T18:23:19+5:30
Viral Video: व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित होण्यासह गोंधळात पडत आहेत.

सरळ नव्हे तर उलटी चालते ही कार, विचित्र डिझाइन पाहून तुमचाही उडेल गोंधळ
दररोज सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित होण्यासह गोंधळात पडत आहेत. तुम्हाला वाटत असेल की, या व्हिडिओत असं नेमकं काय आहे. तर, हा व्हिडिओ एका कारचा आहे. पण, ही कार सरळ चालण्याऐवजी उलटी चालतीये. होय, या कारची रचना इतकी विचित्र आहे की लोक टक लावून त्या कारला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आतापर्यंत अनेकांनी त्यांच्या आजूबाजूला किंवा इंटरनेटवर पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक किंवा गॅसवर चालणारी वाहने पाहिली आहेत. या सर्व गाड्यांची रचना जवळपास सारखीच आहे. पण, सोशल मीडियावर ही कार पाहिल्यानंतर लोकांच्या मनात गोंधळ उडाला आहे. लोकांनी अशा कारची कधी कल्पनाच केली नसेल. पण, व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर या कारची रचना तुमच्या लक्षात येईल.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल
हेपगुल 5 नावाच्या अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एकट्या इंस्टाग्रामवर या व्हिडिओला 945 लाईक्स मिळाले असून, अनेकजण शेअरदेखील करत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ कुठला आहे आणि त्या वाहनाची किंमत काय आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.