अपघातानंतर महिलेनं गमावली होती स्मरणशक्ती, बॉयफ्रेन्ड अन् मुलीलाही विसरली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:27 IST2025-01-31T16:26:49+5:302025-01-31T16:27:27+5:30
जेव्हा बॉयफ्रेन्ड तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता, तेव्हा तिनं त्याला कॅब ड्रायव्हर म्हणून ट्रिट केलं. इतकंच नाही तर तिला एक मुलगी असल्याचंही आठवत नव्हतं.

अपघातानंतर महिलेनं गमावली होती स्मरणशक्ती, बॉयफ्रेन्ड अन् मुलीलाही विसरली!
कल्पना करा की, सकाळी झोपेतून उठल्यावर तुमच्या पार्टनरनं तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना ओळखंलच नाही तर...? नक्कीच कुणाही आयुष्य उद्ध्वस्त होईल. अनेक वर्षांपासून सोबत राहत असलेली व्यक्ती अचानक तुम्हाला विसरत असेल तर यापेक्षा अजून काय वाईट होऊ शकतं. कॅनडामध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. या महिलेच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे ती तिच्या बॉयफ्रेन्डला विसरली. जेव्हा बॉयफ्रेन्ड तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता, तेव्हा तिनं त्याला कॅब ड्रायव्हर म्हणून ट्रिट केलं. इतकंच नाही तर तिला एक मुलगी असल्याचंही आठवत नव्हतं.
एका इंग्रजी वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ३३ वर्षीय नेश पिल्लई जेव्हा ९ वर्षांची होती तेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये परिवारासोबत तिचा अपघात झाला होता. त्यानंतर तिला फिट येऊ लागल्या होत्या. २०२२ मध्ये तिच्या डोक्याला इजा झाली. जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा तिची स्मरणशक्ती गेली होती. तिला हेही आठवत नव्हतं की, तिला एक पार्टनर आहे, ज्याचं नाव जोहेनस जॅकोप आहे. ती तिच्या ६ वर्षाच्या मुलीला सुद्धा विसरली होती.
जेव्हा जोहेनस तिला हॉस्पिटलला घेऊन जात होता, तेव्हा तिला तो कॅब ड्रायव्हर वाटला होता. ती ३ दिवस हॉस्पिटलमध्ये होती आणि डॉक्टरांनी तिला चेक केलं. तेव्हा समजलं की, तिला एका न्यूरोलॉजिस्टही गरज आहे. जोहेनसनं नेशची साथ सोडली नाही. यादरम्यान अनेकदा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. गेल्यावर्षी दोघांनी लग्न केलं. दोघांचा परिवारही दोघांना खूप सपोर्ट करतो. जोहेनस आता ती आंघोळ करत असताना बाथरूमच्या बाहेरच उभा राहतो. जेणेकरून ती हे विसरू नये की, ती काय करत आहे.
दुसऱ्या मुलाला दिला जन्म
नेश म्हणाली की, तिचा पती या पूर्ण प्रवासात खूप संयमानं वागला आणि तिची साथ दिली. तिनं न्यूजवीकला सांगितलं की, ती भलेही तिच्या मुलीला ओळखत नव्हती, पण तिला पुन्हा पुन्हा मातृत्वाची जाणीव होत होती. ज्यामुळे तिला जाणवत होतं की, तिच्यावरही कोणत्यातरी मुलाची जबाबदारी आहे. महिलेनं सांगितलं की, जोहेनसच्या प्रेमामुळे ती पुन्हा त्याच्यावर प्रेम करू लागली. आता कपलनं आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आता नेशवर एक माहितीपटही तयार केला जाणार आहे.