कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:29 IST2025-11-08T19:29:07+5:302025-11-08T19:29:54+5:30
अनेकांना वाटते की, कार ही त्यांच्यासाठी प्रायव्हेट स्पेस आहे. आपण काहीही करू शकतो. पण असे नाही...

प्रतिकात्मक फोटो...
आजकालचे तरुण जोडपी डेटिंगला जातात, एकमेकांसोबत वेळ घालवतात, एकमेकांना समजून घेतात आणि जवळीक वाढवते. यात कीस अथवा चुंबनासारख्या शारीरिक जवळीकीपर्यंतही गोष्टी पोहोचतात. अनेक वेळा पार्किंग लॉट किंवा निर्जन ठिकाणीही कारमध्ये असे होऊ शकते. अनेकांना वाटते की, कार ही त्यांच्यासाठी प्रायव्हेट स्पेस आहे. आपण काहीही करू शकतो. पण असे नाही.
सार्वजनिक ठिकाणी जोडप्यांचे अधिकार
हात धरून चालणे, आलिंगन देणे किंवा बसून बोलणे हे पूर्णतः कायदेशीर आहे. पोलिस यात हस्तक्षेप करू शकत नाहीत, कारण यात अश्लील कृत्य (Obscene Act) नाही. मात्र, अश्लील कृत्य केल्यास पोलिस कारवाई करू शकतात. यात तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्यास, पोलिस थेट अटक करू शकतात आणि न्यायालयात हजर करू शकतात.
कारमध्ये कीस करताना पोलिस पकडू शकतात? -
मॉल किंवा पार्किंग लॉटसारख्या सार्वजनिक ठिकाणी आपण करमध्ये कीस करू शकतो असे अनेकांना वाटते. मात्र, हे कायद्याने चूक आहे. भारतात सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्त करमे बेकायदेशी आहे. जर तुमची कार सार्वजनिक ठिकाणी उभी असेल आणि त्यात बसून तुम्ही कीस करत असाल, तर हे अश्लील कृत्य ठरू शकते. अशा वेळी पोलिस तुम्हाला थांबवू शकतात, चौकशी करू शकतात आणि गरज पडल्यास ताब्यातही घेऊ शकतात. हा नियम पती-पत्नी आणि प्रेयसी-प्रियकर दोघांनाही लागू होतो.
पोलिस केव्हा रोखू शकतात ? -
सार्वजनिक उपद्रव – तुमच्या कृतीमुळे इतरांना त्रास होत असल्यास.
तक्रार आल्यास – जोडीदार किंवा तिसऱ्या व्यक्तीची तक्रार आल्यास.
आदेश न पाळल्यास – पोलिसांनी थांबवल्यावर विरोध किंवा वाद घातल्यास.