व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 09:14 IST2024-11-27T09:14:27+5:302024-11-27T09:14:49+5:30
लग्नासाठी इच्छुक मुलीने एका वृत्तपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
लग्नासाठी आपल्या स्वप्नातील जोडीदार कसा असावा, याचा विचार मुलगा असो किंवा मुलगी, दोघेही करतात. मात्र, काही जणांच्या खूप अटी असतात. या अटी अनेकदा चेष्टेचा विषय बनतात. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. त्यात इच्छुक तरुण तरुणी त्यांचा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत असतात. यातच एक भन्नाट प्रकार समोर आला आहे.
लग्नासाठी इच्छुक मुलीने एका वृत्तपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. या मुलीचे वय ३० वर्षे आहे. मी स्वतः शिकलेली आहे, असे तिने या जाहिरातीत लिहिले आहे. आता तुम्ही म्हणाल या जाहिरातीत नेमकं तिने लिहिलंय, तर तिला कसा नवरा हवाय याबाबत इच्छा लिहून दिल्या आहेत.
तिला २५-२८ वयोगटातील स्वतःचा चांगला व्यवसाय, बंगला आणि किमान २० एकरचे फार्महाऊस असलेला नवरा हवा आहे. त्याला स्वयंपाकदेखील बनविता आला पाहिजे. ही मुलगी स्वतः भांडवलशाहीविरोधातील आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही लग्नाची जाहिरात आहे की, चेष्टेने केलेले एखादे मीम, असेही काहींनी विचारले आहे