Burglar breaks into a restaurant eats and sleeps before theft | Video : रेस्टॉरन्टमध्ये चोरी करण्याआधी चोराने जे केलं ते पाहून लोटपोट होऊन हसाल!

Video : रेस्टॉरन्टमध्ये चोरी करण्याआधी चोराने जे केलं ते पाहून लोटपोट होऊन हसाल!

आजकाल लोक सुरक्षेसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात. सीसीटीव्ही फुटेज, अलार्म अशा अनेक गोष्टींचा वापर होतो. घरांपासून ते ऑफिसपर्यंत सुरक्षेसाठी या गोष्टींचा वापर केला जातो. पण तरीही काही चोर हे अशी सुरक्षा भेदूनही घरात-ऑफिसमध्ये घुसतात. 

नेहमीच आपण वेगवेगळ्या विचित्र चोऱ्यांबाबत ऐकत किंवा वाचत असतो. म्हणजे काही चोर हे फार पुढचा विचार करतात. ते कशाही सुरक्षेला भेदून घरात शिरतात. आता हीच चोरी बघा ना...तुम्हाला या चोराने काय केलं यावर विश्वासही बसणार नाही.

Hindustan Times च्या एका वृत्तानुसार, ही घटना जॉर्जियातील आहे. २५ डिसेंबरची ही घटना असून चोर एका रिकाम्या रेस्टॉरन्टमध्ये रात्री शिरला. तो खिडकीतून आत शिरला. पण त्याने केलेला कारनामा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये बघायला मिळतं की, चोर रेस्टॉरन्टमध्ये शिरल्यावर आधी स्वत:साठी मस्तपैकी जेवण तयार करतो. जेवणावर मस्त ताव मारतो. त्यानंतर तब्बल ३ तासांची मस्त झोपही घेतो आणि नंतर झोपेतून उठल्यावर एक लॅपटॉप आणि टॅबलेट घेऊन पसार होतो.


Web Title: Burglar breaks into a restaurant eats and sleeps before theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.