बर्गर किंगची भन्नाट ऑफर, 'एक्स' चा फोटो दाखवून फुकट खा बर्गर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 18:19 IST2020-02-08T17:56:48+5:302020-02-08T18:19:35+5:30
जेव्हा कोणत्याही कपल्सचं ब्रेकअप होत असतं. त्यावेळी खूपचं दुखद प्रसंग असतो.

बर्गर किंगची भन्नाट ऑफर, 'एक्स' चा फोटो दाखवून फुकट खा बर्गर...
(Image credit-pinterest,everydayknoe.com)
जेव्हा कोणत्याही कपल्सचं ब्रेकअप होत असतं. त्यावेळी खूपचं दुखद प्रसंग असतो. वेगवेगळे विचार मनात येत असतात. कोणाचचं खाण्यापिण्यात आणि कोणतंही काम करण्यात मन लागत नसतं. काही कपल्स मानसीक त्रास झाल्यामुळे जेवणच सोडून देतात. पण जर तुमचं सुद्धा ब्रेकअप झालं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बर्गर किंग मध्ये जाऊन तुम्ही फुकट बर्गर खाऊ शकता. हो हे खरं आहे व्हॅलेनटाईन डे साठी खास ही ऑफर आहे.
ज्या कपल्सचं नातं तुटलं आहे अशा लोकांसाठी बर्गर किंगने ही भन्नाट ऑफर काढली आहे. फक्त एकच अट या ऑफरसाठी बर्गर किंग कडून ठेवण्यात आली आहे. ते म्हणजे ज्या व्यक्तीसोबत तुमचं ब्रेकअप झालं आहे. अशा व्यक्तीचा फोटो तुम्हाला मोफत बर्गर खाण्याचा आनंद घेण्याआधी दाखवावे लागतील.
अनेक वर्षापूर्वीचा आपल्या एक्सचा फोटो दाखवून सुद्दा तुम्ही बर्गर किंगमध्ये जाऊ शकता. पण ही फुकट बर्गर खाण्याची ऑफर भारतात नाही तर बर्गर किंगने अमेरिकेत दिली आहे. काही मोजक्या स्टोरमध्ये ही ऑफर आहे. बर्गर किंगच्या ही जबरदस्त ऑफर अमेरिकेच्या न्यूयॉर्क, बोस्टन आणि सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणच्या काही शाखांमध्ये ही ऑफर देण्यात येत आहे.
ही ऑफर एक नवीन सिनेमा बट्स च्या प्रोमोशनसाठी देण्यात येत आहे. ज्यांना मोफत बर्गर खायचा आहे. अशा लोकांना फक्त आपल्या एक्सचा फोटो सिनेमाची थीम असलेल्या ब्रेकअप बॉक्सवर प्रिंट करायचा आहे. त्यानंतर बर्गर मोफत दिला जाईल.