आली लहर केला कहर! जोशात येऊन तरूणाने पकडले वळूचे शिंग आणि मग धडाम् धूम्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 12:19 IST2021-08-14T12:18:48+5:302021-08-14T12:19:00+5:30
छपरा शहरातील आर्य़ नगर सोनार पट्टीमधील ही घटना आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ ३ ऑगस्टचा आहे.

आली लहर केला कहर! जोशात येऊन तरूणाने पकडले वळूचे शिंग आणि मग धडाम् धूम्....
बिहारच्या छपरामध्ये वळुसोबत मस्ती करणं एका तरूणाला चांगलंच महागात पडलं. घराबाहेर उभ्या वळूचे शिंग तरूणाने पकडले. अनेकदा वळूने डोकं हलवत तरूणाला दूर केलं. पण तरूण पुन्हा पुन्हा शिंग पकडत होता. बराच चाललेल्या या ड्रामानंतर अखेर वळूला इतका राग आला की, त्याने तरूणाला उलचून आपटलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
छपरा शहरातील आर्य़ नगर सोनार पट्टीमधील ही घटना आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ ३ ऑगस्टचा आहे. इथे लोकांनी सांगितलं की, वळू जास्तकरून याच भागात फिरत राहतो. रोजप्रमाणे वळू या भागात फिरत होता. तेव्हाच एका तरूणाने वळूसोबत छेडछाड सुरू केली.
लोकांनी सांगितलं की, वळू तसा कुणावर हल्ला करत नाही. तो घरांसमोर येऊन उभा राहतो. त्यानंतर लोक जेही देतात ते तो खातो आणि पुढे जातो. पण तरूणाने वळूला त्रास दिला. ज्यामुळे तो आक्रामक झाला. व्हायरल व्हिडीओमध्ये बघितलं जाऊ शकतं की, तरूण वळूसोबत काही बोलताना दिसला. त्यानंतर त्याने वळूचे शिंग पकडले. नंतर दोन-तीन वेळा आपल्या डोक्याने त्याला बाजूला केलं. पण तरूण काही ऐकत नाही.
त्यानंतर वळू असा काही संतापला की वळूने तरूणाला शिंगावर उचलून जमिनीवर आपटलं. सुदैवाने त्यानंतर वळूने त्याच्यावर हल्ला केला नाही. जमिनीवर आपटल्यावर तरूणाला हलक्या जखमा झाल्या आहेत. तर या घटनेचा व्हिडीओ शेजारच्याच लोकांनी रेकॉर्ड केला. नंतर तरूण उठला आणि निघून गेला.