ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या दिवशी नवरदेवाचा छोटा भाऊ पडला नवरीच्या प्रेमात अन् झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:53 IST2022-03-29T16:52:36+5:302022-03-29T16:53:48+5:30

लग्नादरम्यान नवरदेवाचा लहान भाऊ चक्क नवरीच्या प्रेमात पडला. यानंतर असं काही घडलं की, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.

brother of groom fall in love with bride during wedding and what happened | ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या दिवशी नवरदेवाचा छोटा भाऊ पडला नवरीच्या प्रेमात अन् झालं असं काही...

ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या दिवशी नवरदेवाचा छोटा भाऊ पडला नवरीच्या प्रेमात अन् झालं असं काही...

लग्न म्हटलं की मजा, मस्ती आणि भन्नाट किस्से हे आलेच. लग्नाच्या सीझनदरम्यान भारतात अनेक विचित्र घटनाही घडत असतात. देश-विदेशातून देखील अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतात. विविध हटके व्हिडीओ आणि घटना तुफान व्हायरल होत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. येथे लग्नादरम्यान नवरदेवाचा लहान भाऊ चक्क नवरीच्या प्रेमात पडला. यानंतर असं काही घडलं की, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.

नवरीच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीनेच या घटनेबद्दल सांगितलं आहे. आपल्या सोशल मीडियावर या व्यक्तीने हे सर्व शेअर केलं आहे. ही जुनी घटना आहे आणि एक वेदनादायक गोष्ट आहे असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी सांगितलं की, त्यांच्या मोठ्या भावाचं लग्न होत होतं, आणि त्या दरम्यान नवरीच्या प्रेमात पडलो. मात्र याबद्दल कोणालाच काही सांगितलं नव्हतं. 

रिपोर्टनुसार, काही दिवसांनंतर नवरदेवाचा म्हणजे मोठ्या भावाचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. लहान भावाने आपल्या वहिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला अनेक वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकतच या व्यक्तीला कोणीतरी सोशल मीडियावर वहिनीसोबत लग्न करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात व्यक्तीने सर्व गोष्ट सांगितली. 

लग्नाच्या मंडपातच त्याचा आपल्या वहिनीवर जीव जडला. मात्र यावेळी त्याने कोणाला काहीच सांगितलं नाही. यानंतर अचानक भावाचा मृत्यू झाला. यानंतर भावाने तिच्याशी लग्न केलं. सध्या ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय भावाच्या मृत्यूनंतर योग्य पाऊल उचलल्याने त्याचं कौतुकही केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: brother of groom fall in love with bride during wedding and what happened

टॅग्स :marriageलग्न