महिलेने दया दाखवत यूक्रेनच्या तरूणीला घरात दिला आसरा, तिनेच पळवला तिचा पती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 11:54 AM2022-05-23T11:54:59+5:302022-05-23T11:55:37+5:30

Britain : ज्या तरूणीवर दया दाखवत तिने घरात जागा दिली तिने महिलेच्या पतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि महिलेचा पती तरूणीसोबत पळून गेला.

British woman gave home to Ukrainian refugee girl she ran away with her husband | महिलेने दया दाखवत यूक्रेनच्या तरूणीला घरात दिला आसरा, तिनेच पळवला तिचा पती

महिलेने दया दाखवत यूक्रेनच्या तरूणीला घरात दिला आसरा, तिनेच पळवला तिचा पती

Next

Shocking News: यूक्रेनवर जेव्हापासून रशियाने हल्ला केला, तेथील बरेच लोक देश सोडून दुसऱ्या देशात गेले. यूक्रेनची एक २२ वर्षीय तरूणी पळून ब्रिटनला पोहोचली. इथे एका महिलेने दया दाखवत तिला आपल्या घरात शरण दिली. पण या तरूणीला आपल्या घरात जागा देऊन महिलेने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. ज्या तरूणीवर दया दाखवत तिने घरात जागा दिली तिने महिलेच्या पतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि महिलेचा पती तरूणीसोबत पळून गेला.

'द सन' ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेने सांगितलं की, यूक्रेनमधून पळून आल्यावर तिने २२ वर्षीय सोफिया कार्कादिमला आपल्या घरात आसरा दिला होता. पण या तरूणीने तिचा १० वर्षापासूनचा पती पळवून नेला. टोनी गार्नेट नावाच्या महिलेने याच महिन्यात सोफिया कार्कादिम नावाच्या तरूणी आपल्या घरात जागा दिली होती. यानंतर तिचा पती आणि ही तरूणी जवळ आले. महिलेने सांगितलं की, तिची नजर सुरूवातीपासून माझ्या पतीवर होती. 

महिलेने सांगितलं की, तरूणीने फेसबुक पेजवर संपर्क केला होता. ज्यानंतर तिने एकटी समजून तरूणीला आपल्या घरात शरण देण्याचा निर्णय घेतला. महिलेने सांगितलं की, तिच्या पतीला स्लोवाकियाई भाषा येत होती आणि तरूणी यूक्रेनी भाषेत बोलत होती. दोन्ही भाषा एकसारख्या आहे. ज्यामुळे तिला समजलं नाही की, दोघे काय बोलत आहेत. हळूहळू दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले आणि तिचा पती तरूणीसोबत पळून गेला.

दुसरीकडे आऱोपी तरूणी म्हणाली की, टोनीला बघताच तो तिला आवडला होता. ती त्याच्या प्रेमात पडली होती. ती म्हणाली की, तिने काहीही मुद्दामहून केलं नाही. जे काही झालं त्यासाठी तिला दु:खं आहे. पण आता ती काहीही करू शकत नाही. तेच महिलेचा पती म्हणाला की, आता तो २२ वर्षीय सोफियाच्या प्रेमात आहे. आता त्याला पूर्ण आयुष्य तिच्यासोबत जगायचं आहे.
 

Web Title: British woman gave home to Ukrainian refugee girl she ran away with her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.