शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

केवळ ९० रूपयांना घेतली होती फूलदानी, आता मिळाली ४.४ कोटी रूपये किंमत, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 3:32 PM

इथे एका व्यक्तीने एका चॅरिटी शॉपमधून ९० रूपयांना एक फूलदानी खरेदी केली होती.

जेव्हा नशीब चमकतं तेव्हा एखाद्याचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. इथे एका व्यक्तीने एका चॅरिटी शॉपमधून ९० रूपयांना एक फूलदानी खरेदी केली होती. नंतर त्याला समजलं की, ही फूलदानी ३०० वर्ष जुनी आहे. तर त्याने याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आणि एका चीनी व्यक्तीने ही फूलदानी तब्बल ४८४ पाउंड म्हणजेच ४.४ कोटी रूपयांना खरेदी केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही फूलदानी ३०० वर्ष जुनी असून १८व्या शतकातील एका चीनी शासकाचा याच्याशी संबंध आहे. त्यामुळे ही फूलदानी खास झाली आहे. या फूलदानीवर १७३५ ते  १७९६ पर्यंत चीनवर शासन करणारे सम्राट कियानलोंग यांच्याशी संबंधित चिन्ह आहेत.

या फूलदानीची बनावटही फार वेगळी आहे. सामान्यपणे फूलदानी या टेबलवर ठेवण्यासाठी तयार केल्या जातात. पण ही फूलदानी भींतीवर लावण्यासाठी तयार केली होती. त्यासोबतच या फूलदानीचा पिवळा रंगही फार महत्वाचा आहे. कारण हा रंग १७व्या आणि १८व्या शतकात चीनी शासकांसाठी आरक्षित होता.

ब्रिटनमधील व्यक्तीने ही फूलदानी वेगळ्या बनावटीमुळे खरेदी केली होती. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, त्यांना फार आनंद झाला आहे. लिलावातून मिळालेल्या पैशातून ते त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचं भविष्य चांगलं करतील.  दरम्यान, कियानलोंग क्विंग वंशाचे सहावे सम्राट होते. त्यांचं निधन ८७ व्या वयात १७९९ मध्ये झालं होतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीनhistoryइतिहास