शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बोंबला ! वरात आली, लोक जेवले झिंगाट नाचले अन् ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 12:44 IST

आग्र्यातील एका घरी रविवारी वरात आली. स्वागत समारंभानंतर जेव्हा सप्तपदीचा तयारी झाली तेव्हा नवरदेव बदलल्याचा आरोप करत नवरीने लग्नास नकार दिला.

लग्न म्हटलं की, नेहमीच काहीना काही विचित्र किस्से ऐकायला मिळतात. कधी भांडणाचे तर कधी जेवणाचे. आता एक लग्नाचा वेगळाच किस्सा समोर आला आहे. आग्र्यातील एका घरी रविवारी वरात आली. स्वागत समारंभानंतर जेव्हा सप्तपदीचा तयारी झाली तेव्हा नवरदेव बदलल्याचा आरोप करत नवरीने लग्नास नकार दिला. खूप समजावल्यानंतरही नवरी काही ऐकली नाही तेव्हा नवरदेव आणि वरातीतील लोकांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

ही घटना आहे विष्णुपुरा गावातील. इथे राहणाऱ्या करिश्माचं लग्न कानपूर नगरच्या जयप्रकाशसोबत ठरलं होतं. रविवारी रात्री वरात आली आणि वरातही दणक्यात निघाली. जेवण झाल्यावर नवरदेव सप्तपदीसाठी गेला तर नवरीने त्याचा चेहरा पाहिल्यावर नवरदेव बदलल्याचा आरोप केला आणि लग्नास नकार दिला. (हे पण वाचा : पतीच्या डोक्यावर केस नाहीत....पती सेल्फी काढत नाही, मेरठमधील घटस्फोटाच्या विचित्र कारणांनी व्हाल हैराण...)

नवरी म्हणाली की,  ज्या नवरदेवाचा फोटो तिने पाहिला होता तो हा नाहीच. त्याच्या जागी दुसरा नवरदेव आणला आहे. दोन्ही कुटुंबिय बराच वेळ तिला समजावत राहिले. पण ती काहीच ऐकत नसल्याचं पाहून नवरदेव आणि त्याचे पाहुणे पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी नवरीवर आणि तिच्या परीवारावर कारवाईची मागणी केली. (हे पण वाचा : लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न...)

ती म्हणायची,  भेटला नाही तर मरेल...

नवरदेव जयप्रकाश म्हणाला की, लग्न ठरलं आणि एक महिना आम्ही दिवस-दिवसभर फोनवर बोलत होतो. अनेकदा बोलण्याच्या नादात आम्ही जेवण केलं नाही. ती म्हणायची की, तू जर मला भेटला नाही तर ती विष खाऊन जीव देईल आणि तुला फसवेन. आता लग्नाची वेळ आली तर तिने असं केलं. आम्हाला आमचा खर्च झालेला पैसा परत हवा आहे. (हे पण वाचा : आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात....)

एडीट केला होता फोटो

दबक्या आवाजात लोक सांगत आहेत की, लग्नासाठी पाठवण्यात आलेल्या फोटोत मोबाइल अॅपचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे फोटोत आणि प्रत्यक्षात चेहऱ्यात फरक दिसत आहे. पण हे नवरदेवाच्या परिवाराकडून याबाबत काही सांगण्यात आलं नाही. पोलीस म्हणाले की, दोन्ही पक्षासोबत बोलणी सुरू आहे. लवकरच कारवाई केली जाईल. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नJara hatkeजरा हटके