"नवरा मित्रांसोबत गेला तर...."; लग्नात नवरीने केली 'अशा' कॉन्ट्रॅक्टवर सही, ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 16:57 IST2022-11-10T16:55:13+5:302022-11-10T16:57:40+5:30
नवरदेवाच्या मित्रांनी हे मॅरेज कॉन्ट्रॅक्ट आणलं असून लग्नाआधीच नवरीची यावर सही घेतली आहे.

"नवरा मित्रांसोबत गेला तर...."; लग्नात नवरीने केली 'अशा' कॉन्ट्रॅक्टवर सही, ऐकून व्हाल हैराण
सोशल मीडियावर एक मॅरेज कॉन्ट्रॅक्ट लेटर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये नवरीसाठी अजब-गजब अटी-शर्थी लिहिण्यात आल्या आहेत. नवरदेवाच्या मित्रांनी हे मॅरेज कॉन्ट्रॅक्ट आणलं असून लग्नाआधीच नवरीची यावर सही घेतली आहे. लग्नानंतर आपण असंच पुढेही एकमेकांना सतत भेटत राहिलं पाहिजे असं नवरदेवाच्या मित्रांना वाटत होतं. रात्री एन्जॉय करता यावं, फिरण्यासाठी कोणीही रोखू नये असंच त्यांना वाटत होतं.
मॅरेज कॉन्ट्रॅक्ट लेटरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, अर्चना असं नवरीचं नाव असून ती तिचा नवरा रघू एस केडीआरला त्याच्या मित्रांसह रात्री 9 वाजेपर्यंत वेळ घालवण्यास परवानगी देईल. तसेच याच दरम्यान सतत फोनही करायचा नाही. नवरीसह याचे साक्षीदार म्हणून आणखी दोन जणांनी देखील या कॉन्ट्रॅक्टवर सही केली आहे. स्टॅम्पवर 5 नोव्हेंबर ही तारीख लिहिली असून सह्या ही केलेल्या दिसत आहे.
मॅरेज कॉन्ट्रॅक्ट लेटर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं असून चर्चेचा विषय ठरला आहे. रिपोर्टनुसार, केरळमध्ये ही घटना घडली आहे. पलक्कडच्या कांझीकोडमध्ये 5 नोव्हेंबर रोजी या दोघांचं लग्न झालं. नवरदेवाच्या मित्रांनी गिफ्ट म्हणून त्याला हटके कॉन्ट्रॅक्ट लेटर दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.