Bride-Groom Video: धक्कादायक! लग्नात जोडप्याने पेटवून घेतले, मग सैरावैरा धावत सुटले; पाहा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 14:11 IST2022-05-13T14:08:17+5:302022-05-13T14:11:35+5:30
Bride-Groom Video: एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात नवरा आणि नवरी स्वतःच्या शरीराला आग लावून धावताना दिसत आहेत.

Bride-Groom Video: धक्कादायक! लग्नात जोडप्याने पेटवून घेतले, मग सैरावैरा धावत सुटले; पाहा व्हिडिओ...
Wedding Video: लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरी आयुष्यभर आठवणीत राहाव्यात, अशा अनेक गोष्टी करतात. अशाच प्रकारची एक विचित्र गोष्ट एका जोडप्याने केली आहे. आपले लग्न नेहमी आठवणीत राहेव, यासाठी जोडप्याने स्वतःला पेटवून घेतले. स्वतःला आग लावल्यानंतर दोघे एकमेकांचा हात धरुन धावत सुटले.
वधू-वराने स्वतःला पेटवून घेतले
डीजे आणि वेडिंग फोटोग्राफर रॉस पॉवेल याने टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये नवदाम्पत्य विचित्र स्टंट करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये वधू आणि वर स्वतःला पेटवून घेतात आणि धावत सुटतात. यादरम्यान, तिथे उपसथित फोटोग्राफर त्यांचे फोटो क्लिक करतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'जेव्हा स्टंट करणारे लोक लग्न करतात,' असे लिहीले आहे.
इशारा: वधू आणि वर हे प्रशिक्षित असून, त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. कृपया हे घरी करून पाहू नका!
आग लावल्यानंतर हे दोघे एकमेकांचा हात धरुन काही अंतरापर्यंत धावले आणि थांबले. यावेळी तात्काळ त्यांच्या अंगावरील लाग विझविण्यात आली. या स्टंटवेळी दोघांच्या शरीरावर अँटी-बर्न जेल लावले होते, त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. हा धक्कादायक स्टंट करणारे जोडपे प्रोफेश्नल स्टंटमन गॅबे जेसॉप आणि अंबीर बंबीर आहेत. हे दोघेही हॉलिवूड चित्रपटांमध्ये स्टंटमन आणि स्टंटवूमन म्हणून काम करतात.