नवरदेवाला 'त्या' गाण्यावर डान्स करणं पडलं महागात, नवरीच्या वडिलांनी रद्द केलं लग्न...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:00 IST2025-02-03T14:59:59+5:302025-02-03T15:00:24+5:30
याच व्हायरल होण्याच्या नादात नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी वरातीमध्ये असं काही केलं की, लग्नात एकच गोंधळ उडाला.

नवरदेवाला 'त्या' गाण्यावर डान्स करणं पडलं महागात, नवरीच्या वडिलांनी रद्द केलं लग्न...
सगळ्यांनाच वाटत असतं की, त्यांचं लग्न यादगार व्हावं. लग्नात सगळं परफेक्ट असावं आणि लोाकांनी नाव काढावं. लग्नातील रील आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण याच व्हायरल होण्याच्या नादात नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी वरातीमध्ये असं काही केलं की, लग्नात एकच गोंधळ उडाला.
ही घटना १६ जानेवारीला दिल्लीत घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिपोर्टनुसार, वरातीसोबत लग्न मंडपात पोहोचलेल्या नवरदेवाला त्याच्या मित्रांनी ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर डान्स करण्यास तयार केलं. नवरदेवही मित्रांचं म्हणणं ऐकून नाचू लागला. पण हा नजारा नवरीच्या वडलांना अजिबात आवडला नाही.
लग्नासाठी आलेले पाहुणे नवरदेवाचा डान्स पाहून आनंद घेत होते. पण नवरीच्या वडलांना हे सगळं अपमानकारक वाटलं. त्यांना हे इतकं विचित्र वाटलं की, त्यांनी डान्स तर थांबवलाच, सोबतच लग्नही कन्सल करून टाकलं.
रिपोर्टनुसार, या संपूर्ण घटनेमुळे नवरी भावूक होऊन रडायला लागली होती. तर नवरदेव आपल्या होणाऱ्या सासऱ्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, नवरीच्या वडलांनी त्याचा काहीच ऐकलं नाही आणि लग्न कॅन्सल केलं.
या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी नवरीच्या वडिलाच्या निर्णयाचं स्वागत केलं, तर काहींनी नवरदेवाचं सांत्वन केलं.