लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीने प्रियकरासोबत राहण्याची मागितली परमिशन, नवरदेवाने दिली आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 09:03 AM2023-06-02T09:03:39+5:302023-06-02T09:05:48+5:30

इथे नवरदेवाने लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीचा हात तिच्या बॉयफ्रेंडच्या हातात दिला. चला जाणून घेऊ नवरदेवाने असं का केलं?

Bride eloped with lover after 20 days of marriage in Palamu Jharkhand husband gives the permission | लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीने प्रियकरासोबत राहण्याची मागितली परमिशन, नवरदेवाने दिली आणि मग....

लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीने प्रियकरासोबत राहण्याची मागितली परमिशन, नवरदेवाने दिली आणि मग....

googlenewsNext

सध्या लग्नाचा सीझन सुरू असल्याने अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. कुठे नवरी पळून जाते तर कुठे नवरदेव अजब कारणाने लग्नास नकार देतो. पण झारखंडच्या पलामूमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे नवरदेवाने लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीचा हात तिच्या बॉयफ्रेंडच्या हातात दिला. चला जाणून घेऊ नवरदेवाने असं का केलं?

लग्न झाल्यावर सामान्यपणे नवरी आनंदात असते. तिच्या नव्या आयुष्याला सुरूवात झालेली असते. पण ही नवरी शांत आणि एकटी राहत होती. कुणाला भेटत नव्हती आणि कुणाशी बोलत नव्हती. पण लपून आपल्या प्रियकरासोबत बोलत होती. हे काही दिवसातच नवरदेवाला समजलं. त्याच्याही लक्षात आलं की, वडिलांचा मान ठेवण्यासाठी त्याने या मुलीशी लग्न तर केलं पण ती खूश नाहीये.

अशात लग्नाच्या 20व्या दिवशी ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जात होती. तेव्हाच गावातील लोकांनी दोघांना पकडलं आणि पोलिसांकडे घेऊन गेले. पतीला माहिती मिळताच तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. यावेळी त्याने सगळ्याना हैराण करणारं असं काही केलं. त्याने नवरीचा हात तिच्या बॉयफ्रेंडच्या हातात दिला. तिथे असलेल्या लोकांना त्याने सांगितलं की, त्याच्या परवानगीनेच पत्नी घरातून पळून जात होती.

ही घटना पलामू जिल्ह्याच्या बीचकिला गावातील आहे. इथे मनोर कुमार सिंहचं लग्न 10 मे रोजी प्रियंकासोबत झालं होतं. काही दिवसातच मनोज कुमार सिंह याला समजलं की, पत्नीचं तिच्या गावातील तरूणासोबत अफेअर सुरू आहे. दोघेही 10 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण त्यांची जात वेगळी असल्याने लग्न होऊ शकलं नाही.

लग्नानंतरही तिला तिच्या प्रियकराकडे जायचं होतं. यासाठी तिने पतीची परवानगी घेतली होती. पोलीस अधिकारी कमलेश कुमार म्हणाले की, नवरदेव आणि नवरीच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली आहे. पण तरूणीचे कुटुंबिय आले नाहीत. या बुधवारी मनोजने आनंदाने त्याच्या पत्नीचा हात तिच्या प्रियकराच्या हातात दिला.

याबाबत मनोज म्हणाला की, 10 मे रोजी त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर त्याची नवी नवरी खूश नव्हती. मग समजलं की, प्रियंकाचा एक प्रियकर आहे आणि तिला त्याच्यासोबत रहायचं आहे. यासाठी त्याने परवानगी दिली. पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून जात होती तेव्हा गावातील लोकांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांकडे घेऊन गेले.

तेच प्रियंका म्हणाली की, ती तिच्या या लग्नाने खूश नव्हती. हे तिने तिच्या पतीलाही सांगितलं होतं. तिला तिच्या प्रियकरासोबत रहायचं होतं. तिने प्रियकर जितेंद्रसोबत आधी लग्नही केलं आहे. हे तिने कुटुंबियांनाही सांगितलं होतं. पण त्यांनी जबरदस्ती तिचं लग्न मनोजसोबत लावून दिलं.

Web Title: Bride eloped with lover after 20 days of marriage in Palamu Jharkhand husband gives the permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.