फुलपाखराला चिरडून मारलं, त्याचं लिक्विड शरीरात इंजेक्ट केलं; सात दिवसांनी मुलाचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:56 IST2025-02-22T12:55:17+5:302025-02-22T12:56:12+5:30

ब्राझीलच्या या मुलानं सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारत फुलपाखराला चिरडून मारलं आणि त्यातून निघालेलं लिक्विड इंजेक्शनमध्ये भरून शरीरात इंजेक्ट केलं.

Brazil 14 year boy died after taking butterfly injection, Social media challenge takes his life | फुलपाखराला चिरडून मारलं, त्याचं लिक्विड शरीरात इंजेक्ट केलं; सात दिवसांनी मुलाचा मृत्यू!

फुलपाखराला चिरडून मारलं, त्याचं लिक्विड शरीरात इंजेक्ट केलं; सात दिवसांनी मुलाचा मृत्यू!

सोशल मीडियावरील विचित्र चॅलेंजच्या नादाला लागून अनेकदा अनेकांचा जीव गेला आहे. असंच विचित्र चॅलेंज स्वीकारून आता एका १४ वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला आहे. ब्राझीलच्या या मुलानं सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारत फुलपाखराला चिरडून मारलं आणि त्यातून निघालेलं लिक्विड इंजेक्शनमध्ये भरून शरीरात इंजेक्ट केलं. त्यानंतर त्याची तब्येत बिघडल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सात दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला.

ब्राझीलच्या या मुलानं डॉक्टरांसमोर मान्य केलं की, त्यानं फुलपाखराला चिरडून मारलं आणि त्याच्यातून निघालेलं लिक्विट इंजेक्शनच्या माध्यमातून शरीरात इंजेक्ट केलं होतं. असं केल्यावर त्याला उलट्या होऊ लागल्या आणि तो व्यवस्थित चालूही शकत नव्हता. त्यानंतर त्याचे वडील त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. एक आठवडा त्याच्या उपचार करण्यात आले. पण सातव्या दिवशी त्याची जीव गेला.

पोलिसांनी सुरू केली चौकशी

पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. तर ब्राझीलच्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की, हा मुलगा कदाचित एखाद्या प्रयोगाची नक्कल करत होता. ज्याबाबत त्याला ऑनलाईन माहिती मिळाली असेल. पण मृत्यूआधी त्यानं सांगितलं होतं की, असं काही नाहीये.

या मुलानं मेडिकल स्टाफला सांगितलं होतं की, त्यानं मेडिकलमधून एक औषध आणलं होतं. त्यानंतर फुलपाखरू मारून पाण्यात टाकलं. त्यात औषधही टाकलं. हे मिश्रणं इंजेक्शनच्या माध्यमातून उजव्या पायात इंजेक्ट  केलं होतं.

हॉस्पिटलमधील एक्सपर्ट लुईस फर्नांडो डी. रेल्वास यांनी सांगितलं की, मुलाला एम्बोलिज्म, इन्फेक्शन किंवा एलर्जी रिअॅक्शन झालं असू शकतं. आम्हाला माहीत नाही की, त्यानं हे मिश्रण कसं सुरू केलं आणि शरीरात किती टाकलं. 

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, मुलाच्या वडिलाला घराची सफाई करत असताना मुलाच्या उशीखाली त्यानं वापरलेली सिरिंज दिसली. एक्सपर्ट मुलाचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेत आहेत.

Web Title: Brazil 14 year boy died after taking butterfly injection, Social media challenge takes his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.