बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिलं खास गिफ्ट, पण काहीचवेळात आली फायरब्रिगेडला बोलवण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 20:32 IST2022-07-14T20:29:51+5:302022-07-14T20:32:10+5:30
या सरप्राईजमुळे त्याच्या प्रेयसीची भयानक अवस्था झाली. प्रियकराने आपल्या प्रेयसीला अंगठी घालून प्रपोज केले. मात्र, ही अंगठी मुलीसाठी त्रासदायक ठरली.

बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिलं खास गिफ्ट, पण काहीचवेळात आली फायरब्रिगेडला बोलवण्याची वेळ
अनेक जण लग्नाआधी आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला वेगवेगळ्या पद्धतीने प्रपोज करतात. मात्र, एका प्रियकराने लग्नाआधी आपल्या प्रेयसीला एक सरप्राईज दिले. यानंतर मात्र, या सरप्राईजमुळे त्याच्या प्रेयसीची भयानक अवस्था झाली. प्रियकराने आपल्या प्रेयसीला अंगठी घालून प्रपोज केले. मात्र, ही अंगठी मुलीसाठी त्रासदायक ठरली.
नेमकं काय झालं -
प्रेयसीचे नाव पॅरिसिया आहे. तर प्रियकराचे नाव विलिस, असे आहे. पॅरिसियाला तिचा प्रियकर विलिसने रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले होते. पॅरिसिया एक वेडिंग आणि इव्हेंट डिझायनर आहे. ती दक्षिण पूर्व लंडन (यूके) मध्ये राहते. पेरिसिया बोटात अंगठी अडकली. ती बाहेर काढण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण ती अपयशी ठरली. त्याला मदतीसाठी अग्निशमन दलाच्या टीमला पाचारण करावे लागले.
अखेर मुलीला अंगठी कापावी लागली. अंगठीची किंमत सुमारे दोन लाख रुपये होती. पॅरिसियाने सांगितले की, अंगठी काढण्यासाठी तिने साबण, बर्फ वापरला, यूट्यूब व्हिडिओची मदत घेतली. मात्र, तरीसुद्धा काहीही फायदा झाला नाही.
अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या बोटाला सूज आली. यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला फोन करून बोलावले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक अंगठीला कापून काढले. नंतर पॅरिसियाची अंगठी ज्वेलर्सना परत करण्यात आली. जेणेकरून तिला व्यवस्थित केले जावे आणि तिचा आकार वाढवता यायला हवा.
हे जोडपे ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. अंगठीच्या दुर्घटनेबद्दल पॅरिसियाने सांगितले की, विलिसने त्याच्या जुन्या अंगठीतून नवीन अंगठी बनवली होती. पण विलिसने त्याला याबद्दल सांगितले नाही. विलिसला पॅरिसियाला सरप्राईज द्यायचे होते. पण सर्व काही योजनेनुसार झाले नाही.