ब्रेकअप नंतर बॉयफ्रेंडकडून मागितले पैसे, यावर त्याने जे काही केलं ते पाहुन तुम्हाला बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 15:55 IST2021-11-28T15:51:10+5:302021-11-28T15:55:00+5:30

अ‍ॅनाबेलचं आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप (Breakup) झाला. यानंतर तिनं आपले सर्व पैसे परत मागितले. बॉयफ्रेंडला (Boyfriend) ही बाब इतकी खटकली की त्यानं यानंतर जे काही केलं ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

boyfriend gives copper coins to girlfriend to repay the money he took from her | ब्रेकअप नंतर बॉयफ्रेंडकडून मागितले पैसे, यावर त्याने जे काही केलं ते पाहुन तुम्हाला बसेल धक्का

ब्रेकअप नंतर बॉयफ्रेंडकडून मागितले पैसे, यावर त्याने जे काही केलं ते पाहुन तुम्हाला बसेल धक्का

जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही लोक असेही असतात जे समोरच्यासोबत चांगले संबंध असताना त्याच्यासोबत चांगलं वागतात. मात्र, संबंध बिघडताच ते आपली मर्यादा विसरून जातात. असंच काहीसं अ‍ॅनाबेल मॅकेसोबत (Annabelle Mackay) घडलं. अ‍ॅनाबेलचं आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप (Breakup) झाला. यानंतर तिनं आपले सर्व पैसे परत मागितले. बॉयफ्रेंडला (Boyfriend) ही बाब इतकी खटकली की त्यानं यानंतर जे काही केलं ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

TikTok वर तरुणीने आपली स्टोरी शेअर केली आहे. तिनं सांगितलं की जेव्हा ते रिलेशनमध्ये होते, तेव्हा बॉयफ्रेंडने अनेकदा तिच्याकडून उसने पैसे घेतले. तेव्हा त्यांचं नातं चांगलं असल्याने तरुणीने त्याच्याकडे है पैसे मागितले नाहीत. मात्र जेव्हा ब्रेकअप झाला तेव्हा तिने विचार केला की पैसेही परत घ्यायला हवे. मात्र कदाचित तिच्या एक्स बॉयफ्रेंडला हे आवडलं नाहीं.

बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अ‍ॅनाबेलने त्याला आठवण करून दिली की त्याने तिच्याकडून काही पैसे घेतले होते. मात्र बॉयफ्रेंडने जो प्लॅन केला तो काहीतरी वेगळाच होता. या व्यक्तीने अ‍ॅनाबेलला हे पैसे बँक ट्रान्सफर किंवा कॅश नोटांमध्ये दिले नाहीत. तर त्याने एक चपलांचा बॉक्स घेतला. त्याने कॉपरचे सिक्के यात भरून ठेवले. अशा प्रकारे पैसे मिळाल्यानंतर अ‍ॅनाबेलने हे शेकडो सिक्के काउंटिंग मशीनमध्ये टाकले. हे सिक्के £51.37 म्हणजेच ५ हजार रुपयाहून अधिक निघाले. या तरुणीसाठी आपल्या एक्सचं हे कृत्य शॉकिंग होतं.

अ‍ॅनाबेलचा हा व्हिडिओ आतापर्यंत २.३ मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. तर २ लाख ९१ हजारहून लाईक केला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की अखेर या तरुणीला आपले पैसे तर मिळाले. एका यूजरनं लिहिलं, आपण दिलेली सगळी रक्कम परत घेतानाही लाज वाटते. आणखी एकाने लिहिलं की असलं काम करण्यासाठी डोकं लावावं लागतं.

Web Title: boyfriend gives copper coins to girlfriend to repay the money he took from her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.