बॉयफ्रेन्डच्या परिवाराला समजलं गर्लफ्रेन्डचं सर्वात मोठं गुपित आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 17:08 IST2022-03-25T17:07:39+5:302022-03-25T17:08:46+5:30
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अॅडल्ट मॉडल ‘Future Ex-Wife Kay’ ने इन्साइड ओन्लीफॅन्स नावाच्या पॉडकास्टवर तिच्या आयुष्याशी संबंधित गुपिताचा खुलासा केला.

बॉयफ्रेन्डच्या परिवाराला समजलं गर्लफ्रेन्डचं सर्वात मोठं गुपित आणि मग...
प्रत्येक व्यक्तीचं एक असं सीक्रेट असतं ज्याबाबत त्यांना कुणालाही काही सांगायचं नसतं. कारण लोक व्यक्तीला त्याच्या आवडी-निवडीवरून जज करू लागतात. पण जेव्हा हे सीक्रेट सर्वांसमोर येतं तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात वादळ येतं. एका अॅडल्ट कंटेंट (adult career) तयार करणाऱ्या महिलेसोबत असंच काहीसं झालं. तिच्या सीक्रेटबाबत तिच्या बॉयफ्रेन्डच्या परिवाराला समजलं.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अॅडल्ट मॉडल ‘Future Ex-Wife Kay’ ने इन्साइड ओन्लीफॅन्स नावाच्या पॉडकास्टवर तिच्या आयुष्याशी संबंधित गुपिताचा खुलासा केला. के ही एक अॅडल्ट कंटेंट क्रिएटर आहे आणि इन्स्टाग्रामवर तिचे लोख फॉलोअर्स आहेत. इतर प्लॅटफॉर्मवरही तिचे फॅन्स आहेत. तिने पॉडकास्टमध्ये सांगितलं की, कशाप्रकारे तिच्या बॉयफ्रेन्डच्या परिवाराला तिच्याबाबत समजलं.
मॉडलनुसार, जेव्हा तिचा बॉयफ्रेन्ड तिला त्याच्या परिवारासोबत भेटवायला घेऊन गेला तेव्हा ती फार साधेपणाने तयार होऊन गेली होती. जेणेकरून त्यांना शंका येऊ नये की ती काय करते. पण काय माहीत कशी हळूहळू परिवारासमोर तिच्या सोशल मीडियाच्या सीक्रेटबाबत सत्य समोर येत गेलं. आधी बॉयफ्रेन्डच्या आईला तिच्या प्रोफेशनबाबत समजलं. त्यांनी के ला ट्विटरवर फॉलो केलं. ज्यावर ती फारच आक्षेपार्ह फोटो शेअर करत होती. त्यानंतर त्यांनी तिला टिकटॉकवर फॉलो केलं.
पण अडचण तेव्हा निर्माण झाली जेव्हा बॉयफ्रेन्डच्या एका चुलत भावांना याबाबत समजलं आणि ते तिला सोशल मीडियावर फॉलो करू लागले. एक चुलत भाऊ तर नेहमीच के चे फोटो लाइक करत होता. हे तिला आवडलं नाही. ती म्हणाली की, ते तिचं प्रोफेशन आहे. त्यात चांगलं किंवा खराब असं काही नाही. पण बॉयफ्रेन्डच्या भावाला त्या फोटोंमध्ये इंटरेस्ट का आहे, तो सगळे लाइक करतो. के म्हणाली की, यामुळे तिला सहज वाटत नाही आणि तिला वाटतं की, बॉयफ्रेन्डच्या परिवारातील लोक त्यांच्यी सीमा ओलांडत आहेत.