पतीला खूश करण्यासाठी पत्नीनं केलं बोल्ड फोटोशूट; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 20:06 IST2020-01-29T20:05:51+5:302020-01-29T20:06:55+5:30

पतीला खूश करण्यासाठी दिलेलं गिफ्ट पत्नीला भलतंच महागात पडलं आहे.

Bold photoshoot done to please husband; Something happened ... | पतीला खूश करण्यासाठी पत्नीनं केलं बोल्ड फोटोशूट; झालं असं काही...

पतीला खूश करण्यासाठी पत्नीनं केलं बोल्ड फोटोशूट; झालं असं काही...

पतीला खूश करण्यासाठी दिलेलं गिफ्ट पत्नीला भलतंच महागात पडलं आहे. पत्नीनं दिलेलं गिफ्ट पाहून खूश होण्याऐवजी पती तिच्यावर भडकला आणि पत्नीकडे त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. नाराज आणि दुःखी पतीनं आपली ही करुण कहाणी एका पोर्टलवर शेअर केली. अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या पतीनं सांगितलं की,  माझ्या पत्नीनं काही बोल्ड फोटो काढले आहेत. त्याचा एक अल्बम तयार करून मला गिफ्ट दिला आहे. पत्नीचा अल्बम पाहून पहिल्यांदा पती खूश झाला आणि त्यानं हे सर्व फोटो तू स्वतः काढले आहेस का?, असा प्रश्न विचारला.

उत्तरात तिनं नाही म्हटलं.  त्यानंतर त्यानं एखाद्या महिलेनं तुझे हे बोल्ड फोटोग्राफ काढले आहेत काय?, अशी विचारणा केली. त्याचं नाही असं उत्तर दिल्यानंतर पतीचा पाराच चढला. म्हणजे तुझे एखाद्या पुरुष फोटोग्राफरने हे फोटो काढले आहेत, असं म्हणत त्यानं तिला फैलावर घेतले. असं करण्याआधी मला एकदा विचारावंसं तुला वाटलं नाही काय?, असा प्रश्नच पतीनं उपस्थित केला. परपुरुषासमोर बोल्ड फोटो काढणं पतीला अजिबात आवडलेलं नाही. तर दुसरीकडे पत्नीच्या मते पतीनं रागावण्याऐवजी दिलेलं गिफ्ट पाहून खूश व्हायला हवे होते. परपुरुषासमोर बोल्ड फोटो काढून पतीनं फार चुकीचं काम केलेलं आहे. वारंवार असं बोलून पतीनं डिवचल्यामुळे पत्नी अखेर घर सोडून गेली आहे. त्यानंतर सोशल मीडियावरही पतीला उपदेशाचे डोस पाजण्यात आले आहेत.

पतीनं पत्नीला स्वतःच्या मुठीत ठेवू इच्छितो, अशी काहींनी टीका केली आहे, तर काहींनी तो संकुचित विचारांचा असल्याचं सांगत त्याला खडेबोल सुनावले आहेत. फोटोशूट करणारे फोटोग्राफर हे प्रोफेशनल असतात, त्यांना फक्त आपल्या कामाशी मतलब असतो, असं म्हणत एका युजर्सनं त्याला सुनावलं आहे. त्यामुळे पत्नीवर अधिराज्य गाजवण्याचा पतीचा हेतू चुकीचा आहे. तर काहींनी पतीचीसुद्धा बाजू घेतली आहे. 

Web Title: Bold photoshoot done to please husband; Something happened ...