बाबो! एक्सरसाइज करताना तरूणीच्या शरीरातून घामाऐवजी निघतं रक्त, डॉक्टरही झाले हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 14:06 IST2019-06-18T13:57:40+5:302019-06-18T14:06:26+5:30
जगभरातील लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि वजन वाढू नये साठी जिममध्ये जाऊन कसरत करतात.

बाबो! एक्सरसाइज करताना तरूणीच्या शरीरातून घामाऐवजी निघतं रक्त, डॉक्टरही झाले हैराण!
(प्रातिनिधीक छायात्रित)
जगभरातील लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि वजन वाढू नये साठी जिममध्ये जाऊन कसरत करतात. तासंतान जिममध्ये लोक घाम गाळतात. केवळ जिममध्येच नाही तर मेहनतीचं कोणतही काम केलं तर शरीरातून घाम निघतो. मात्र, जगात एक अशीही मुलगी आहे जिच्या शरीरातून एक्सरसाइज केल्यावर घाम निघण्याऐवजी रक्त निघतं. हे जरा विचित्र वाटत असलं तरी खरं आहे.
(Image Credit : MyFitnessPal Blog)
जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही लोक इतरांपेक्षा फारच वेगळे असतात. या लोकांबाबत नेहमी ऐकायलाही मिळतं. असंच एक प्रकरण इटलीतून समोर आलं आहे. इथे एक २१ वर्षीय तरूणी विचित्र आजाराने त्रस्त आहे. या आजारामुळे तिच्या शरीराने कोणत्याही प्रकारची मेहनत केली तर शरीरातून घामाऐवजी रक्त वाहू लागतं.
(Image Credit : Stephen Coleclough)
जिममध्ये एक्सरसाइज करताना या तरूणीच्या डोक्यातून, हातांमधून रक्त येऊ लागतं. डॉक्टरही हा आजार पाहून हैराण झाले आहेत. त्यांनाही प्रश्न पडला आहे की, घामाऐवजी तिच्या शरीरातून रक्त का निघतं. जेव्हा तिची टेस्ट केली गेली तेव्हा समोर आलं की, या मुलीला ब्लड स्वेटिंग नावाचा आजार आहे.
(Image Credit : www.self.com)
या आजारामुळे तरूणीच्या शरीरातून घामाऐवजी रक्त निघतं. सध्या या तरूणीवर इटलीमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टर तिचा रक्तदाब नियंत्रित करून ब्लड स्वेटिंगला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही तरूणी अजून पूर्णपणे बरी झालेली नाही. तिच्यावर उपचार सुरू आहेत.