कोण कुणासोबत कधी करणार रोमान्स? एका नात्यात तीन लोक, रोमान्सचा कॉन्ट्रॅक्ट केला साइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:21 IST2022-08-30T13:21:20+5:302022-08-30T13:21:51+5:30

तरूणीचं मत आहे की, कॉन्ट्रॅक्ट केल्याने त्यांचं नातं जास्त काळ चालत आहे. हे प्रकरण अमेरिकेतील ओक्लाहोमातील आहे. 26 वर्षीय इरी इवर्स बायसेक्शुअल आहे.

Bisexual Woman with boyfriend girlfriend romance contract strict rule | कोण कुणासोबत कधी करणार रोमान्स? एका नात्यात तीन लोक, रोमान्सचा कॉन्ट्रॅक्ट केला साइन

कोण कुणासोबत कधी करणार रोमान्स? एका नात्यात तीन लोक, रोमान्सचा कॉन्ट्रॅक्ट केला साइन

एक तरूणी एकाचवेळी तिच्या बॉयफ्रेन्ड आणि गर्लफ्रेन्डसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. म्हणेज तीन लोक त्यांच्या सहमतीने रिलेशनशिपमध्ये आहेत. तिघांनाही या नात्याबाबत काहीच समस्या नाही. यासाठी तरूणीने दोन्ही पार्टनरसोबत एक रोमानस कॉन्ट्रक्टही साइन केला आहे.

तरूणीचं मत आहे की, कॉन्ट्रॅक्ट केल्याने त्यांचं नातं जास्त काळ चालत आहे. हे प्रकरण अमेरिकेतील ओक्लाहोमातील आहे. 26 वर्षीय इरी इवर्स बायसेक्शुअल आहे. बायसेक्शुअल म्हणजे व्यक्ती पुरूष आणि महिला दोघांसोबतही शारीरिक संबंधासाठी आकर्षित होऊ शकते. 

इरी इवर्स 33 वर्षीय टॉम स्मिथ आणि 32 वर्षीय एलेक्स जोन्ससोबत एकत्र रिलेशनशिपमध्ये आहे. यासाठी त्यांनी एक रूटीनही तयार केला आहे. इरी आणि टॉमने एक कॉन्ट्रॅक्ट साइन केला आहे. यात त्यांनी तिसऱ्या रिलेशनशिपबाबत अनेक गोष्टी मान्य केल्या आहेत. 

इरी जेव्हाही बाहेर असते तेव्हा टॉम एलेक्सला डेट करतो. लॉ स्टुडंट इरीने सांगितलं की, मी फार नशीबवान आहे की, प्रेम करण्यासाठी माझ्याकडे दोन लोक आहेत. मला वाटत नव्हतं की, एकत्र एकापेक्षा जास्त लोकांसोबत प्रेम केलं जाऊ शकतं. पण टॉम आणि एलेक्ससोबत हे नैसर्गिक वाटतं. 

सप्टेंबर 2015 मध्ये इरीची भेट टॉमसोबत झाली होती. दोघांची भेट एका डेटिंग साइटवर झाली होती. पहिल्या भेटीपासूनच दोघे रिलेशनशिपमध्ये होते. सुरूवातीला नात्यात फक्त दोघेच होते. पण दोन वर्षांनी त्यांनी रिलेशनशिप ओपन केलं.

इरीने सांगितलं की, सुरूवातीपासून टॉमला माहीत होतं की, मला मुली आवडतात आणि त्यामुळे सेक्शुअॅलिटी एक्सप्लोर करण्याचा प्लान केला. आम्ही एक कॉन्ट्रॅक्टही केला. जेणेकरून आमच्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये काही समस्या येऊ नये. तीन वर्ष दोघांना अनेकांसोबत रोमान्स केला. पण मग दोघांनी एका परमनंट पार्टनरचा शोध घेतला. 

जानेवारी 2021 मध्ये दोघांची भेट एलेक्ससोबत झाली. ती एक सायकोथेरपिस्ट आहे. तिघांमध्ये बोलणं सुरू झालं. मग इरी आणि एलेक्स एकमेकांना पसंत करू लागल्या. नंतर एलेक्सही टॉम आणि इरीसोबत नात्यात जुळली गेली. 10 महिन्यांनंतर इरी आणि टॉमसोबत एलेक्सही शिफ्ट झाली. पण मग टॉम वेगळा राहू लागला, जेणेकरून दोघींना थोडी स्पेस मिळावी. 

इरीने सांगितलं की, ती आता सोमवारी आणि बुधवारी एलेक्ससोबत वेळ घालवते. मंगळवार आणि गुरूवारी ती टॉमसोबत रहाते. शनिवार आणि रविवारी तिघेही सोबत राहतात. इरीने सांगितलं की, या रिलेशनशिपबाबत तिच्या पालकांना काहीच अडचण नाहीये.  

Web Title: Bisexual Woman with boyfriend girlfriend romance contract strict rule