बिकीनी गर्लने मगरीसोबत पाण्यात केलं स्वीमिंग, बघून लोक झाले अवाक्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 16:59 IST2023-05-11T16:57:41+5:302023-05-11T16:59:26+5:30
Viral Video : व्हायरल व्हिडिओच्या सुरूवातीलाच तुम्ही बघू शकता की, एक तरूणी बिकीनीमध्ये दिसत आहे आणि ती एका विशाल मगरीसोबत स्वीमिंग करत आहे.

बिकीनी गर्लने मगरीसोबत पाण्यात केलं स्वीमिंग, बघून लोक झाले अवाक्....
Bikini Girl With Crocodile Video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओंमध्ये प्राण्यांसोबत माणसेही बघायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात एक मगरीसोबत एक तरूणी बिकीनीमध्ये दिसत आहे. क्रिस्टोफर जिलेट नावाच्या तरूणीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ती पाण्यात मगरीसोबत स्वीमिंग करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओच्या सुरूवातीलाच तुम्ही बघू शकता की, एक तरूणी बिकीनीमध्ये दिसत आहे आणि ती एका विशाल मगरीसोबत स्वीमिंग करत आहे. हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ बघणाऱ्यांना एक सूचनाही देण्यात आली आहे की, यात काही धक्कादायक दृश्य आहेत.
दरम्यान, आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मगरीसोबत इतरांनाही असं काही करायचं असेल तर ऑनलाइन बुकिंग करता येईल. यासाठी तुम्हाला www.crocodilechris.com या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. हे तुम्ही फ्लोरिडाच्या होमस्टेडमध्ये एवरग्लेड्स आउटपोस्ट वाइल्डलाइफ रेस्क्यू टीमसोबत सुरक्षितपणे करू शकता.
या व्हिडीओ 3 लाख 76 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.