VIDEO : मालगाडीखाली अडकली होती मुलगी, 'त्याने' स्वत:ची पर्वा न करता वाचवला तिचा जीव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 15:15 IST2022-02-12T15:15:00+5:302022-02-12T15:15:21+5:30
यादरम्यान दोघांच्या वरून ट्रेनचे २६ डबे गेले. असं सांगितलं जात आहे की, दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही घटना ५ फेब्रुवारीची आहे

VIDEO : मालगाडीखाली अडकली होती मुलगी, 'त्याने' स्वत:ची पर्वा न करता वाचवला तिचा जीव!
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक कारपेंटरने आपला जीव धोक्यात टाकून एका तरूणीचा जीव वाचवला. ही घटना बरखेडी भागातील आहे. तरूणी मालगाडीच्या खालून ट्रॅक क्रॉस करत होती. तिला काही समजायच्या आत मालगाडी सुरू झाली. गाडी सुरू होताच तरूणी ओरडायला लागली होती. तिला गाडीखाली अडकलेली पाहून कारपेंटर महबूबने आपल्या जीवाची पर्वा न करता मालगाडीच्या खाली घुसला. तो मुलीला पकडून ट्रॅकवर पडून राहिला.
यादरम्यान दोघांच्या वरून ट्रेनचे २६ डबे गेले. असं सांगितलं जात आहे की, दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही घटना ५ फेब्रुवारीची आहे. माणूसकी दाखवल्याने स्वयंसेवी संस्था चालवणारे शोएब हाशमी यांनी शुक्रवारी महबूबचा सन्मान केला. मेहबूबकडे मोबाइल नव्हता तर शोएब यांनी तो त्याला गिफ्ट केला.
मोहम्मद महबूबचं वय ३६ वर्षे आहे. तो अशोक बिहार बॅंक कॉलनीमध्ये राहतो. तो फर्नीचर बनवण्याचं काम करतो. त्याने सांगितलं की, ५ फेब्रुवारीला रात्री साधारण ८ वाजता तो सोनिया कॉलनीतून नमाज झाल्यावर कारखान्याकडे जात होता. यादरम्यान बरखेडी रेल्वे फाटकाजवळ एक मालगाडी थांबली. लोक त्याच ट्रेनच्या खालून ट्रॅक पार करत होते. अचानक ट्रेन सुरू झाली आणि ट्रॅक पार करत असलेली तरूणी अडकली. ती मदतीसाठी ओरडू लागली होती. तिला बघून तो लगेच ट्रेनकडे गेला आणि हळू जात असलेल्या ट्रेनखाली घुसला. तो मुलीचा हात धरून ट्रेन ट्रॅकवर पडून राहिला. त्यांच्यावरून ट्रेनचे २६ डबे गेले. सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही.