अजब प्यार की गजब कहानी! 2 मुलांची आई पडली नणंदेच्या प्रेमात; गुपचूप केलं लग्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 10:31 IST2023-02-19T10:30:47+5:302023-02-19T10:31:29+5:30

एका वहिनीचं आपल्या नणंदेवर प्रेम होतं, त्यानंतर दोघींनी लग्न केलं आणि एकत्र राहण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं.

bhabi married nanad after love affair in samastipur bihar | अजब प्यार की गजब कहानी! 2 मुलांची आई पडली नणंदेच्या प्रेमात; गुपचूप केलं लग्न अन्...

अजब प्यार की गजब कहानी! 2 मुलांची आई पडली नणंदेच्या प्रेमात; गुपचूप केलं लग्न अन्...

बिहारमधील समस्तीपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका वहिनीचं आपल्या नणंदेवर प्रेम होतं, त्यानंतर दोघींनी लग्न केलं आणि एकत्र राहण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. ही घटना रोसडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढरहरा गावातील असून, वहिनीने आपल्या नणंदेसोबत लग्न केलं आणि तिच्या अपहरणाची तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठले. आधी महिला एएसआयने वहिनीला मुलगा समजून तिची व्यथा ऐकायला सुरुवात केली, पण सत्य समजताच त्यांनाही धक्का बसला. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांची आई असलेली महिला हळूहळू आपल्याच नणंदेच्या प्रेमात पडली आणि मग दोघींनी लग्न केलं. याची माहिती मिळताच नणंदेचे नातेवाईक तिला तेथून घेऊन गेले. यानंतर वहिनीने नणंदेच्या नातेवाईकांवर तिचे अपहरण केल्याचा आरोप केला. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

2013 मध्ये शुक्ला देवीचा विवाह ढरहरा गावात राहणाऱ्या प्रमोदसोबत झाला होता. दरम्यान, ती दोन मुलांची आई देखील झाली, परंतु याच दरम्यान सुकला तिची लहान नणंद सोनीच्या प्रेमात पडली. सुकला मुलासारखी राहू लागली आणि पाच महिन्यांपूर्वी तिने नणंदेसोबत लग्न केलं. दोघीही पती-पत्नीसारखे वैवाहिक जीवन जगू लागले. सुकला यांच्या पतीला ही बाब कळताच त्यांनी दोघींचीही संमती असल्याने कोणताही आक्षेप घेतला नाही. 

सुकला यांचा आरोप आहे की, शुक्रवारी दुपारी त्यांची मोठी वहिनी 10-15 जणांसह आली आणि पत्नी सोनी कुमारीला घेऊन गेली. सुकला यांनी आपली मोठी वहिनी उषा देवी हिच्यावर पत्नी सोनीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत रोसदा पोलीस ठाण्याचे अधिकारी कृष्ण प्रसाद यांनी सांगितले की, सुकला नावाच्या महिलेने अर्ज दिला आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: bhabi married nanad after love affair in samastipur bihar

टॅग्स :marriageलग्न