जबरदस्त! ७ ते ८ दिवस ताजी राहतील केळी, जाणून घ्या सीक्रेट ट्रिक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:58 IST2024-10-28T14:56:42+5:302024-10-28T14:58:45+5:30
केळी तर एक दिवसापेक्षा जास्त ताजी राहत नाहीत. मात्र, फळं ताजी ठेवणं ही एक कला आहे. जर आम्ही सांगितलेली ट्रिक तुम्ही वापरली तर फळं आरामात ८ ते १० दिवस टिकतील.

जबरदस्त! ७ ते ८ दिवस ताजी राहतील केळी, जाणून घ्या सीक्रेट ट्रिक!
How to keep bananas fresh for a week: सामान्यपणे सगळ्याच घरांमधील लोक या गोष्टीने हैराण असतात की, घरात आणलेल्या भाज्या किंवा फळं जास्त दिवस टिकत नाहीत. केळी तर एक दिवसापेक्षा जास्त ताजी राहत नाहीत. मात्र, फळं ताजी ठेवणं ही एक कला आहे. जर आम्ही सांगितलेली ट्रिक तुम्ही वापरली तर फळं आरामात ८ ते १० दिवस टिकतील.
आज आम्ही फळं घरात ताजी ठेवण्यासाठी एक सीक्रेट ट्रिक सांगणार आहोत. सामान्यपणे अनेकजण कमी पिकलेली केळी घरी आणतात, जेणेकरून ते जास्त दिवस टिकावे.
सोशल मीडियावर @user8100293452186 नावाच्या यूजरने सांगितलं की, तुम्ही केळी पिकण्याची प्रक्रिया स्लो करू शकता आणि केळी खराब होण्यापासून वाचवू शकता. यासाठी तुम्हाला एक छोटं काम करायचं आहे.
आधी तर केळी पाण्याने धुवून घेत ती पिकण्यासाठी कारणीभूत तत्व साफ करा. नंतर केळी पेपर टॉवलने पुसून घ्या. नंतर केळीचा वरचा भाग एका ओल्या पेपर टॉवलमध्ये गुंडाळा. जेणेकरून एथिलिनचं रिलीज कमी व्हावं. असं केल्याने केळी जास्त दिवस टिकतील.
sleepjunkie.com च्या एक्सपर्टनुसार, केळी दिवसा कधीही खाऊ शकता. रात्री केळी कधीच खाऊ नये. याने तुमच्या झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा झोपेत तुम्हाला अस्वस्थता वाटू शकते.