'या' बेटावर लपवलेला खजिना शोधण्यासाठी दरवर्षी खोदकाम करतो 'हा' उद्योगपती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:11 IST2019-10-15T14:59:35+5:302019-10-15T15:11:47+5:30
वेगवेगळ्या कथांमध्ये जंगलात किंवा डोंगरांवर खजिना दडला असल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल. या बेटावर दबलेल्या खजिन्याच्याही अशाच अनेक कथा लोकप्रिय आहे.

'या' बेटावर लपवलेला खजिना शोधण्यासाठी दरवर्षी खोदकाम करतो 'हा' उद्योगपती!
(Image Credit : theguardian.com)
बर्नार्ड कइजर एक प्रसिद्ध उद्योगपती असून दरवर्षी तो एका बेटावर दबलेला खजिना शोधण्याचं काम हाती घेतात. चिलीच्या एका छोट्या बेटावर दबलेल्या कथित खजिन्याचा शोध घेण्यासाठी खोदकाम केलं जातं. चिली प्रशासनाने त्याला याची परवानगी देखील दिली आहे. पण काही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला आहे. त्यांचं मत आहे की, याने पर्यावरणाचं नुकसान होत आहे.
खजिन्याबाबत अनेक कथा
वेगवेगळ्या कथांमध्ये जंगलात किंवा डोंगरांवर खजिना दडला असल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल. या बेटावर दबलेल्या खजिन्याच्याही अशाच अनेक कथा लोकप्रिय आहे. १८ व्या शतकातील या कथा आहेत. खजिन्याशी संबंधित एका कथेत सांगण्यात आलं आहे की, १८व्या शतकात स्पेनमध्ये गृह युद्धादरम्यान इथे सोनं सुरक्षित लपवण्यात आलं होतं. काही लोक याची अंदाजे किंमत १० बिलियनपर्यंत सांगतात. असही म्हटलं जातं की, स्पेनच्या राजघराण्यातील एडमिरल जुआन उबिला याला इथे खजिना लपवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
याआधी झाला होता खजिना शोधण्याचा प्रयत्न
असे सांगितले जाते की, उबिलाने मृत्यूआधी खजिना कुठे लपवलाय, याची माहिती एका ब्रिटीश सैन्य अधिकाऱ्याला देण्यात आली होती. नंतर त्या ब्रिटीश अधिकाऱ्याने एका कॅप्टनला खजिना शोधण्यासाठी पाठवले होते. पण त्या कॅप्टनचं जहाज समुद्री वादळात अडकलं होतं आणि त्यामुळे त्याला परत जावं लागलं. असे म्हटले जाते की, कॅप्टनने खजिन्याबाबत ऐकल्यावर जहाजावरील संपूर्ण स्टाफला आणि सदस्यांना ठार केलं होतं. तसेच खजिना शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला काही यश मिळालं नाही.
डच उद्योगपती दरवर्षी करतो खोदकाम
आता डच उद्योगपती बर्नार्ड कइजर हा खजिना शोधण्याचा दरवर्षी प्रयत्न करतो. १० लोकांच्या टीमसोबत तो या बेटावर खोदकाम सुरू करतो. पण गेल्याकाही दिवसांपासून खोदकामा विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रदर्शन सुरू केलंय. जमिनीच्या खाली खोदकाम करून खजिना शोधण्याचा काम केलं जातं.