बाबो! 'या' रेस्टॉरन्टमध्ये पिण्यासाठी दिलं जातं टॉयलेटचं रिसायकल केलेलं पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 14:19 IST2019-10-19T14:13:37+5:302019-10-19T14:19:42+5:30
पाण्याची समस्या जगाला इतकी भेडसावत आहे की, आता वेगवेगळ्या ठिकाणी काही अनोखे उपाय लागू केले जात आहेत. याला भविष्याची तयारी सुद्धा म्हणता येईल.

बाबो! 'या' रेस्टॉरन्टमध्ये पिण्यासाठी दिलं जातं टॉयलेटचं रिसायकल केलेलं पाणी!
पाण्याची समस्या जगाला इतकी भेडसावत आहे की, आता वेगवेगळ्या ठिकाणी काही अनोखे उपाय लागू केले जात आहेत. याला भविष्याची तयारी सुद्धा म्हणता येईल. बेल्जियममध्ये एक असं रेस्टॉरन्ट आहे, जिथे ग्राहकांना सिंक आणि टॉयलेटमधील रिसायकल केलेलं पाणी पिण्यासाठी दिलं जातं. रेस्टॉरन्टने यासाठी एक नवीन टेक्निकचं वॉटर प्युरिफायर लावलं आहे.
कुर्नेतील Gust Eaux रेस्टॉरन्टमध्ये ग्राहकांना अलिकडे हेच पाणी दिलं जात आहे. या पाण्याला ना गंध आहे, ना रंग. त्यामुळे हे समजणं कठीण आहे की, हे पाणी कुठून आलं. यासाठी रेस्टॉरन्टमध्ये पाच स्टेजेस असलेलं प्युरिफायर लावण्यात आलं आहे. जे सिंक आणि टॉयलेटमधील पाणी शुद्ध करून पिण्यालायक बनवतं. यात पाणी केवळ शुद्धच केलं जात नाही तर त्यातील मिनरल्सही कायम ठेवले जातात.
(Image Credit : mycariboonow.com)
बेल्जिअममधील हे रेस्टॉरन्ट कोणत्याही सीवेज सिस्टीमसोबत जोडलेलं नाहीये. अशात गटाराचं पाणी बाहेर फेकण्याऐवजी रेस्टॉरन्टने हे पाणी रिसायकल करण्याचा निर्णय घेतला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रेस्टॉरन्टच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, 'आधी आम्ही पाणी प्लांट फर्टिलायजरमध्ये स्वच्छ करतो, नंतर त्यात पावसाचं पाणी मिश्रित केलं जातं. त्यानंतर ते प्युरिफायरमध्ये टाकलं जातं'.
महत्वाची बाब म्हणजे ग्राहकांना हे पाणी रेस्टॉरन्टकडून मोफत दिलं जातं. तसेच या पाण्याचा वापर आइस क्यूब तयार करण्यासाठी, बीअर तयार करण्यासाठी आणि कॉफी तयार करण्यासाठी केला जातो.