Ball Tampering: कितने आदमी थे?... पॉन्टिंग झाला गब्बर, कोहली सांभा; धम्माल व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:15 IST2018-03-29T13:15:00+5:302018-03-29T13:15:00+5:30
रिकी पॉटिंग या तिघांना फैलावर घेत असताना क्विंटन डी-कॉक, फाफ डु प्लेसीस, जो रूट, बेन स्टोक्स, रबाडाला कसा आनंद होईल, याचे मजेशीर चित्रण या व्हिडिओत करण्यात आले आहे.

Ball Tampering: कितने आदमी थे?... पॉन्टिंग झाला गब्बर, कोहली सांभा; धम्माल व्हिडिओ व्हायरल
मुंबई: सध्या सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन खेळाडुंनी केलेल्या Ball Tampering ची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरून अनेक मजेशीर मिम्स आणि मेसेजेस व्हायरल होत आहेत. यामध्ये ‘फॉलो युअर स्पोर्ट’ FOLLOW YOUR SPORT या फेसबुक पेजवरील एक व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यासाठी शोले चित्रपटातील एका दृश्याचा वापर करण्यात आला आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणी रिकी पाँटींगनं स्टिव्ह, डेव्हिड वॉर्नर बँकरॉफ्ट यांना कसं फैलावर घेतलं, हा प्रसंग शोले स्टाईलने रंगवण्यात आला आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सांभाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. रिकी पॉटिंग या तिघांना फैलावर घेत असताना क्विंटन डी-कॉक, फाफ डु प्लेसीस, जो रूट, बेन स्टोक्स, रबाडाला कसा आनंद होईल, याचे मजेशीर चित्रण या व्हिडिओत करण्यात आले आहे. साहजिकच सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या प्रचंड हीट ठरत आहे. अवघ्या १५ तासांच्या आत १० हजार जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
काय आहे प्रकरण
केपटाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसले. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनीतीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे.