शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

"बूट 48 हजारांचे आहेत, पण कंपनीने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आणल्याचं दिसतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 18:11 IST

Balenciaga : कंपनीने घासल्यासारखे आणि फाटल्यासारखे दिसणाऱ्या बुटांचे १०० जोड लिमिटेड एडिशन कलेक्शनमध्ये जारी केले आहे.

लग्जरी ब्रांड आणि फॅशन कंपनी बलेनसियागाने (Balenciaga) असा बूट तयार केला आहे, ज्यावरून नेटिझन्स सोशल मीडियावर कंपनीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. दरम्यान, कंपनीने 'पेरिस स्‍नीकर' कलेक्‍शन जारी केले आहे. खरंतर 'पेरिस स्‍नीकर' कलेक्शनमध्ये ज्या बुटांचा समावेश करण्यात आला आहे, ते खूप घासलेले आणि फाटलेले दिसून येत आहेत. 

कंपनीने घासल्यासारखे आणि फाटल्यासारखे दिसणाऱ्या बुटांचे १०० जोड लिमिटेड एडिशन कलेक्शनमध्ये जारी केले आहे. या बुटांची किंमत  48,279 रुपये (625 अमेरिकी डॉलर) इतकी आहे. दरम्यान, हे बूट पाहून नेटिझन्सनी लिहिले आहे की, 'एकदा पाहिले तर ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहे, असे वाटते.'

बलेनसियागाने (Balenciaga) बूट बनवण्यामागील उद्देश सांगितला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बुटांची क्लासिक डिझाइन आहे, जी मध्यकालीन एथलेटिक्सला दर्शविते. हे बूट काळ्या, पांढऱ्या आणि लाल रंगात आहेत. बुटाला सोल आणि पुढील भागात पांढऱ्या रंगाचा रबर आहे. या बुटांना पाहिले तर असे वाटते की, पहिल्यांदाच कोणीतरी हे बूट घातले आहेत.  

या बुटांची ऑनलाइन विक्री सुरु होताच सोशल मीडियात नेटिझन्सनी कंपनीला ट्रोल करण्यास सुरूवात केली. अनेक युजर्सनी म्हटले की, बलेनसियागाने हे बूट घेऊन आगीत फेकून दिले आहे. दरम्यान, कंपनीने सध्या हे बूट युरोपियन मार्केटमध्ये आणले आहेत. तर मिडिल ईस्ट आणि अमेरिकेतील स्टोअरमध्ये हे बूट १६ मेपासून उपलब्ध होतील. याचबरोबर, जपानमध्ये या बुटांची विक्री २३ मेपासून होणार आहे. तसेच, ऑनलाइन इंटरनॅशनल स्टोअरमधून जगभरातील लोक हे बूट खरेदी करू शकतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया