बाबा वेंगा यांनी 2024 साठी केलेल्या भविष्यवाण्या, किती खऱ्या ठरल्या, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 21:51 IST2024-12-20T21:47:42+5:302024-12-20T21:51:14+5:30
Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांच्या आतापर्यंत अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.

बाबा वेंगा यांनी 2024 साठी केलेल्या भविष्यवाण्या, किती खऱ्या ठरल्या, पाहा...
Baba Vanga Predictions 2024: बल्गेरियातील दिवंगत भविष्यकार बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांनी फार पूर्वीच आपल्या डायरीत जगभरात घडलेल्या अनेक घटनांची माहिती लिहून ठेवल्याचा दावा केला जातो. दुसरे महायुद्ध, 9/11 दहशतवादी हल्लासारख्या अनेक घटना त्यांनी फार पूर्वीच लिहून ठेवल्याचा दावा केला जातो. दरम्यान, बाबा वेंगा यांनी 2024 साठी अने भविष्यवाणी केल्या होत्या, त्यातील किती खऱ्या ठरल्या, ते आपण पाहू.
2024 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी
2024 साठी बाबा वेंगांचे भाकीत भयानक आणि आश्चर्यकारक होते. त्यांनी जागतिक आर्थिक संकट, हवामान संकट आणि वैद्यकीय क्षेत्रातील काही महत्त्वाच्या प्रगतीचा अंदाज वर्तवला होता.
जागतिक आर्थिक संकट
बाबा वेंगा यांनी 2024 मध्ये जागतिक आर्थिक संकटाचे भाकीत केले, जे राजकीय तणाव, बदलत्या आर्थिक शक्ती आणि वाढत्या कर्जामुळे होईल, असे म्हटले होते. अमेरिकेत मंदीची भीती वाढत चालली आहे. अनेक अर्थतज्ञ उच्च महागाई, टाळेबंदी आणि वाढत्या व्याजदरांमुळे शक्यता वर्तवत आहेत.
हवामान संकट
बाबा वेंगा यांचे हवामान संकट गंभीर होणार असल्याचे भाकीतही खरे ठरत आहे. 2024 मध्ये जागतिक तापमानाचा विक्रम मोडणार असल्याचे संकेत आहेत. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या उपसंचालक समंथा बर्गेस यांनी पुष्टी केली की 2024 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असल्याचे सिद्ध होऊ शकते. यावर्षी तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअस जास्त असू शकते. यामुळे जागतिक तापमान रेकॉर्डसाठी एक नवीन मैलाचा दगड ठरू शकतो.
वैद्यकशास्त्रातील प्रगती
वैद्यकीय क्षेत्रातील बाबा वेंगाची आणखी एक सकारात्मक भविष्यवाणी 2024 मध्ये खरी ठरली आहे. यावर्षी गर्भाशयाच्या कर्करोगाच्या उपचारात लक्षणीय प्रगती झाली आहे. इंटरलेस चाचणीच्या निकालांवरून असे दिसून आले की, जर रुग्णांना सामान्य उपचार सुरू करण्यापूर्वी केमोथेरपीचा एक छोटा कोर्स दिला, तर मृत्यूचा धोका 40 टक्क्यांनी कमी होतो.
कोण आहे बाबा वेंगा?
बाबा वेंगा जगातील प्रसिद्ध भविष्यकार होते. त्यांचे संपूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते. त्या बल्गेरियन स्त्री होत्या. त्यांनी बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या भागात आपले आयुष्य घालवले. पुढे त्या बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांचा जन्म 1911 साली झाला होता. मात्र वयाच्या 12 व्या वर्षीच त्यांची दृष्टी गेली. 1996 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पण मरण्यापूर्वी बाबा वेंगा यांनी 5079 पर्यंत जगाविषयी भाकीत केले आहेत.