शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

नवरीच्या शोधात असलेल्या अडीच फुटाच्या अजीम मंसूरीसाठी आलं स्थळ, वाचा काय म्हणाली मुलगी....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 10:25 AM

अजीम मंसूरीचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर रेहानाच्या परिवाराला सुद्धा आशेची किरण दिसली. त्यांनाही वाटलं की, आपलीही मुलगी नवरी होऊ शकते.

शामलीच्या केरानामध्ये राहणारा २ फूट ६ इंच उंचीच्या अजीम मंसूरीचा काही दिवसांपूर्वी व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तो लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्याचा तो व्हिडीओ पाहून यूपीतील गाजियाबादमधून त्याच्यासाठी एक स्थळ आलं आहे. पण अजून अजीमच्या परीवाराने लग्नासाठी होकार दिलेला नाही. गाजियाबादची रेहनाची उंचीही अजीम इतकीच आहे. ती एका गरिब परिवारातील आहे. 

अजीम मंसूरीचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर रेहानाच्या परिवाराला सुद्धा आशेची किरण दिसली. त्यांनाही वाटलं की, आपलीही मुलगी नवरी होऊ शकते. रेहानाच्या परिवाराच्या जवळच्या व्यक्तीने अजीमचा व्हिडीओ पाहिला आणि रेहानाच्या परिवाराला संपर्क केला. काही दिवसांपूर्वीच अजीम लग्नाची मागणी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता. त्याने पोलिसांना त्याच्यासाठी मुलगी शोधण्याची विनंती केली होती. (हे पण वाचा : 'ही' तरूणी आहे लेडी 'गजनी', गर्लफ्रेन्ड आणि परिवाराचीही तिला राहत नाही आठवण!)

२६ वर्षीय अजीमने याआधीही यूपीतील मोठ्या नेत्यांची भेट घेऊन नवरी शोधण्याची मागणी केली होती. पण त्याच्या हाती केवळ निराशा आली. अशीच अवस्था रेहानाच्या परिवाराची आहे. २५ वर्षीय रेहानाला सुद्धा लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये. रेहानाची उंची अडीच फूट आहे. आणि ती घरातील सगळी कामे करते. आता रेहानाच्या परिवाराला अपेक्षा आहे की, ही सोयरीक जुळावी. (हे पण वाचा : नशिब पालटलं ना राव! 'लग्न लावून द्या' म्हणणाऱ्या आझीमसमोर लागलीये मुलींची रांग; म्हणे अशीच नवरी हवी.....)

रेहानाने आजतकसोबत बोलताना सांगितले की, तिला अजीम पसंत आहे आणि तिने त्याचा व्हायरल व्हिडीओ पाहिला आहे. रेहाना घरातील सगळी कामे करते. तसेच ती शिवणकामही शिकली आहे. तर अजीम  एक व्यावसायिक आहे आणि त्याला एक हाउसवाइफ हवी आहे. रेहानाची आई याशमीन म्हणाल्या की, त्यांचं मुलीचं लग्न ठरावं यापेक्षा मोठी कोणती बाब असू शकत नाही. अजीमच्या घरी रेहाना फोटो पाठवण्यात आला आहे.

रेहानाचे वडील म्हणाले की, अजीम आणि रेहानाची जोडी चांगली दिसेल. अजीमच्या घरी रेहानाचं स्थळ घेऊन जाणाऱ्या हारूनने सांगितले की, अजीमच्या वडिलांसोबत फोनवर बोलणं झालं होतं आणि त्यांना मुलीचा फोटो पाठवण्यात आला आहे. आम्हाला आशा आहे की, हे लग्न जुळावं.   

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेGujaratगुजरातUttar Pradeshउत्तर प्रदेश