शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

नवरी वाट बघत बसली होती, तेव्हा नवरदेवाचा फोन आला अन् म्हणाला - मी लग्न करणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:24 IST

हे जेव्हा नवरीच्या वडिलांना समजलं तेव्हा त्यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशात लग्नात आलेल्या लोकांनी त्याना समजावलं आणि असं करण्यापासून रोखलं.

उत्तर प्रदेशच्या आजमगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  इथे 27 डिसेंबर 2023 ला एक नवरी तिच्या नवरदेवाची वाट बघत होती. पण नवरदेव वरात घेऊन आला नाही. असं सांगितलं जात आहे की, हुंडा न मिळाल्याने नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. हे जेव्हा नवरीच्या वडिलांना समजलं तेव्हा त्यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशात लग्नात आलेल्या लोकांनी त्याना समजावलं आणि असं करण्यापासून रोखलं.

नंतर सोमवारी नवरी एसपी ऑफिसमध्ये पोहोचली. तिथे तिने सगळं प्रकरण सांगितलं. त्यानंतर एसपीच्या आदेशानंतर पीडितेची तक्रार नोंदवण्यात आली. पीडितेने सांगितलं की, अजय सरोज नावाच्या व्यक्तीसोबत तिचं अफेअर होतं. लग्नाचं आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा हे पीडितेच्या बहिणीला समजलं तेव्हा तिने अजयच्या आईकडे याबाबत तक्रार केली. ती म्हणाली की, आता अजयला तिच्या बहिणीसोबत लग्न करावं लागेल. पण लग्नाचा विषय ऐकताच अजयने लग्नास नकार दिला.

यानंतर पंचायत बोलवण्यात आली. इथे असं ठरलं की, अजयला या तरूणीसोबत लग्न करावं लागेल. 23 डिसेंबर 2023 ला लग्न ठरलं. यादरम्यान अजयने मावस काका भोला सरोजसोबत बोलण्याच्या बहाण्याने तरूणीला घरी बोलवलं. तरूणी त्याच्या घरी येताच काकाने तिच्यासोबत छेडछाड केली. कशीतरी ती तिथून पळाली. याबाबत तिने कुणाला सांगितलं नाही. कारण तिला वाटत होतं की, लग्नात काही अडथळा होऊ नये.

त्यानंतर जसा लग्नाचा दिवस जवळ आला नवरी तयारी करून वरातीची वाट बघत होती. पण तेव्हाच तिला अजयचा फोन आला. त्याने अजयच्या वडिलांना सांगितलं की, तो वरात घेऊन येणार नाही. लग्न करणार नाही. हे ऐकताच नवरीच्या वडिलांना धक्का बसला. त्यांनी अजयला खूप समजावलं. पण तरी तो तयार नव्हता, अशात त्यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लग्नात उपस्थित लोकांनी त्याना समजावलं आणि असं करण्यापासून रोखलं. हुंडा न मिळाल्या कारणाने नवरदेवाने लग्नास नकार दिला होता.

एसपी सिटी शैलेंद्र लाल यांनी सांगितलं की, पीडितेच्या तक्रारीवरून नवरदेवा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करून तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई होईल.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttar Pradeshउत्तर प्रदेश