जबरदस्त ! नवरा बायकोने असा काय केला डान्स,बॉलिवूड कलाकारांनाही देतायेत टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 15:14 IST2020-06-01T15:14:47+5:302020-06-01T15:14:59+5:30

''तू मुमताज है मेरे ख्वाबों की'' या गाण्यावर या जोडप्याने भन्नाट डान्स केला आहे. 

Awesome! Husband And Wife Dance Video Viral On Twitter-SRJ | जबरदस्त ! नवरा बायकोने असा काय केला डान्स,बॉलिवूड कलाकारांनाही देतायेत टक्कर

जबरदस्त ! नवरा बायकोने असा काय केला डान्स,बॉलिवूड कलाकारांनाही देतायेत टक्कर

सध्या सोशल मीडियावर या नवरा-बायकोच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पती-पत्नीचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून सारेच थक्क झाले असून, टॅलेंट असेल तर ते जगासमोर येतेच याचेच हे उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशाच पती पत्नींच्या व्हिडीओंनी धुमाकुळ घातला आहे.आता असाच व्हिडीओ पुन्हा समोर आला आहे. ''तू मुमताज है मेरे ख्वाबों की'' या गाण्यावर या जोडप्याने भन्नाट डान्स केला आहे. 

हा व्हिडीओ पाहून सकारात्क उर्जा निर्माण केल्याच्या कमेंटस लोक देत आहेत. इतकेच नाही तर  काही वेळा मोठ्या आनंदाची वाट पाहताना आपण अशा अनमोल आनंदाकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून नेहमी आनंद हा छोट्या गोष्टींमध्ये शोधल्यास निराशा येत नसल्याचे युजर्स म्हणत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच काही तासात हा व्हिडिओ 6 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.इतकेच नाही तर 900 हून अधिक पसंतींना 150 हून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंत केले आहे.

Web Title: Awesome! Husband And Wife Dance Video Viral On Twitter-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.