जगातील सगळ्यात श्रीमंत देशात किती वर्ष जगतात लोक? जाणून घ्या भारताचा नंबर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:42 IST2025-01-16T14:41:24+5:302025-01-16T14:42:14+5:30
Life Expectancy : एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, बदलती ट्रेण्ड पॉलिसी आणि इकॉनॉमी ग्रोथमुळे लोकांची जगण्याची ईच्छाही वाढली आहे.

जगातील सगळ्यात श्रीमंत देशात किती वर्ष जगतात लोक? जाणून घ्या भारताचा नंबर!
Life Expectancy : जगात फारच वेगानं बदल होत आहे. श्रीमंत देशांचं इन्फ्रास्ट्रक्चर हायटेक होत आहे. या देशांमध्ये आधुनिक हेल्थकेअर सिस्टीम डेव्हलप होत आहे. गावागावात उद्योगधंदे पोहोचत आहेत आणि लोकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. सरकार आर्थिक सक्षम होण्यासाठी आपल्या पॉलिसीत सतत बदल करत आहेत. याचा प्रभाव आयुर्मानावर पडतो. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, बदलती ट्रेण्ड पॉलिसी आणि इकॉनॉमी ग्रोथमुळे लोकांची जगण्याची ईच्छाही वाढली आहे. ज्यामुळे जगातील टॉप अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये आयुर्मान दरात सुधारणा झाली आहे.
रिपोर्टनुसार, जगातील टॉप २९ मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये जपान सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहे. इथे लोकांचं सरासरी आयुष्य ८४.८ वर्षे इतकं आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, जपानच्या अॅडव्हान्स हेल्थकेअर सिस्टीम, कमी गुन्हेगारी दर आणि अॅक्टिव लाइफस्टाईलनं हाय लाइफ एक्सपेंटेन्सी वाढण्यास मदत केली आहे. तेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर हॉंगकॉंग आहे. इथे लोकांचं सरासरी आयुष्य ८४.३ वर्ष आहे.
'या'' देशांमध्येही वाढलं लोकांचं आयुष्य
जगातील टॉप इकॉनॉमीमध्ये सामिल देशांमध्ये सिंगापूर, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलॅंड, कॅनडा, यूनायटेड किंगडम, थायलॅंड, चीन आणि अमेरिकेत लोकांचं सरसरी आयुष्यात सुधारणा झाली आहे. मोठ्या देशांबाबत सांगायचं तर ऑस्ट्रेलियात सरसरी आयुष्य ८३.६ वर्षे, न्यूझीलॅंडमध्ये ८३.८ वर्षे, चीनमध्ये ७८.५ वर्षे, अमेरिकेत ७८.२ वर्षे झालं आहे.
भारताची रॅंकिंग
जगातील टॉप २९ देशांमध्ये भारत २६व्या नंबरवर आहे. इथे लोकांचं सरासरी आयुष्य ६७.७ वर्षे आहे. भारतानंतर म्यांमार, पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये लोकांचं सरासरी आयुष्य भारताच्या तुलनेत चांगलं आहे. श्रीलंकेत सरासरी आयुष्य ७६.६ वर्षे तर बांग्लादेशमध्ये सरासरी आयुष्य ७३.७ वर्षे आहे. त्याशिवयाय रशियामध्ये सरासरी आयुष्य ७०.१ वर्ष आहे.