'या' गुहेत झोपण्यासाठी दूरदूरून येतात लोक, कारण आहे खास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:01 IST2019-03-13T14:53:00+5:302019-03-13T15:01:45+5:30
असे मानले जाते की, या गुहेत झोपल्याने अनेक आजार दूर होतात.

'या' गुहेत झोपण्यासाठी दूरदूरून येतात लोक, कारण आहे खास!
सामान्यपणे लोक त्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक अशी गुहा आहे जिथे लोक झोपण्यासाठी आणि आपल्या आजारांवर उपचार करण्यासाठी येतात. असे मानले जाते की, या गुहेत झोपल्याने अनेक आजार दूर होतात.
ही गुहा ऑस्ट्रियाच्या गास्तिनमध्ये आहे. असे म्हणतात की, सर्वातआधी इथे लोक सोन्याच्या खाणीच्या शोधात आले होते. पण नंतर त्यांना कळालं की, या गुहेत असणाऱ्या गॅसमुळे अनेक आजारही ठीक होतात. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
या गुहेमध्ये रेडॉन गॅस आढळते आणि असे मानले जाते की, या गॅसच्या संपर्कात अनेक आजारांवर उपचार केले शक्य आहे. रेडॉन गॅस एक रेडिओअॅक्टिव गॅस असतो. या गॅसमुळे गुहेच्या गरम वातावरणात अनेक आजारांवर खोलवर प्रभाव करताना दिसतो.
या गुहेमध्ये येऊन उपचार करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, इथे निघणारा गॅस अर्थरायटिस आणि पसोरिएसिससारख्या आजाराच्या उपचारासाठी फायदेशीर आहे. इथे याकडे नैसर्गिक उपचाराच्या दृष्टीकोनातून बघितलं जातं. तसेच इथे सतत डॉक्टरांची उपस्थिती असते. जे लोकांना त्यांच्या आजारापासून सुटका करण्यास मदत करतात.