3 कोटी पगार, मोफत घर अन् गाडी, इतकं सगळं असूनही नोकरीसाठी मिळत नाही कुणी; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:50 IST2025-04-01T14:50:00+5:302025-04-01T14:50:46+5:30
Australian Town Needs Doctor : 3 कोटी रूपये पगार, रहायला घर, मोफत कार इतक्या सुविधा असूनही ही नोकरी कुणी करायला तयार होत नाही. आता यामागचं कारण काय हेच जाणून घेऊया.

3 कोटी पगार, मोफत घर अन् गाडी, इतकं सगळं असूनही नोकरीसाठी मिळत नाही कुणी; कारण...
Australian Town Needs Doctor: सगळ्यांनाच असं वाटत असतं की, त्यांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी, त्याचं नाव व्हावं आणि एक आलिशान जीवन जगता यावं. पण चांगली नोकरी मिळवणं आजकाल काही सोपी गोष्टी राहिलेली नाही. कारण स्पर्धा खूप वाढली आहे. नेहमीच वेगवेगळ्या नोकऱ्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली असते. सध्या अशाच एका गलेलठ्ठ पगाराऱ्या नोकरीची चर्चा रंगली आहे. 3 कोटी रूपये पगार, रहायला घर, मोफत कार इतक्या सुविधा असूनही ही नोकरी कुणी करायला तयार होत नाही. आता यामागचं कारण काय हेच जाणून घेऊया.
न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलॅंड भागात एक छोटं शहर आहे ज्याचं नाव आहे जूलिया क्रीक. इथे एका नोकरीसाठी जागा निघाली आहे. ज्यासाठी पगार 4.28 लाख रूपये डॉलर इतका म्हणजेच साधारण 3 कोटी रूपये मिळणार आहे. इतकंच नाही तर मोफत घर, कारही मिळत आहे. अशात कुणीही ही नोकरी करण्यासाठी तयार होईल. पण या नोकरीसाठी उमेदवारच मिळत नाहीये.
दूर आहे शहर
ही नोकरी लोकल फॅमिली डॉक्टरची आहे. जूलिया क्रीक नावाच्या या गावात वीजही आहे आणि इंटरनेटही आहे. पण इथे ही नोकरी करायला कुणी धजावत नाही कारण हे शहर इतर मुख्य शहरापासून खूप दूर आहे. इथून क्लीन्सलॅंडची राजधानी ब्रिस्बेनला पोहोचायला 17 तास इतका वेळ लागतो. सगळ्यात जवळचं शहर टाउन्सविले आहे. जे इथून 7 तासांच्या अंतरावर आहे. तसेच इथं वातावरणातही सतत बदल होत राहतो. एका रिपोर्टनुसार, हे शहर इतकं दूर आणि विरळ आहे त्यामुळेच डॉक्टरांना दुप्पट पगार ऑफर केला जात आहे.
कुणासाठी परफेक्ट नोकरी?
इतक्या मोठ्या पगाराच्या नोकरीचा फायदा अशा व्यक्तीला होऊ शकतो ज्यांना शांत जीवन जगण्याची आवड आहे. याआधी इथे डॉ. अॅडम लुइस डॉक्टर होते. ते ब्रिस्बेन शहरात राहण्यासाठी गेले. ते म्हणाले की, ते जेव्हा तिथे होते तेव्हा ते एकट्यानं जीवन जगणं शिकले होते. ते एकटेच लोकांवर उपचार करत होते. इतकंच नाही ते गायीचं दूध काढणंही शिकले होते. अॅडम यांच्याआधी या शहरात जो परमनन्ट डॉक्टर होता तो 15 वर्षाआधी होता. जूलिया क्रीकचे महापौर म्हणाले की, इथे लाइफस्टाईल खूप चांगली आहे. आधीच्या डॉक्टरचा दोन वर्षाचा करार संपला आहे. ते परिवारासोबत ब्रिस्बेनला परत गेले.