फिरता फिरता रहस्यमय आयलॅंडवर पोहोचली ही व्यक्ती, जंगलात राहणारे आदिवासी आले आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:03 IST2023-01-02T10:51:53+5:302023-01-02T11:03:05+5:30
Youtuber Visits Forgotten Island : ऑस्ट्रेलियन यूट्यूबर ब्रॉडी मॉस एक ब्लॉगर आहे. तो व्हिडीओसाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जात असतो. अनेकदा वेगळं काही करण्यासाठी अनोखे काम करतो.

फिरता फिरता रहस्यमय आयलॅंडवर पोहोचली ही व्यक्ती, जंगलात राहणारे आदिवासी आले आणि....
Youtuber Visits Forgotten Island : काही लोकांना जगभरात फिरणं आवडतं. तर काही लोकांना अशा ठिकाणांवर जाणं आवडतं जिथे आधी कुणीच गेलं नाही. असं काही करण्याचा प्लान एका यूट्यूबरने केला. फिरता फिरता तो अशा ठिकाणी गेला ज्याबाबत केवळ ऐकलं होतं. हा यूट्यूबर एका अशा बेटावर पोहोचला, ज्याचा बाहेरच्या जगाशी काहीच संबंध नव्हता.
ऑस्ट्रेलियन यूट्यूबर ब्रॉडी मॉस एक ब्लॉगर आहे. तो व्हिडीओसाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जात असतो. अनेकदा वेगळं काही करण्यासाठी अनोखे काम करतो. ब्रॉडी मॉस ने नॉदर्न वानुअतु (Northern Vanuatu) ला जाण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणाला 'फॉरगॉटन आइलॅंड' असही म्हटलं जातं.
यूट्यूबर ब्रॉडी मॉस हा केवळ एका अनोळखी बेटावर गेलाच नाही तर तेथील आदिवासी लोकांना भेटला सुद्धा.
त्याने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर त्यांच्यासोबतच एक क्लिपही टाकली आहे. या व्हिडीओला 7 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नंतर त्याने त्याच्या प्रवासाचा एक पूर्ण व्हिडीओही यूट्यूबवर अपलोड केला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, यूट्यूबर जसा या आयलॅंडवर पोहोचतो तेव्हा बरेच लोक धनुष्य-बाण घेऊन त्याच्याजवळ पोहोचतात आणि त्याला घेऊन जंगलात जातात.
या लोकांनी या यूट्यूबरचं फारच शानदार स्वागत केलं. कॅमेरामनने सगळंकाही शूट केलं. व्हिडीओत त्यांनी दाखवलं की, कशाप्रकारे आदिवासी लोकांनी त्यांचं मोकळ्या मनाने स्वागत केलं. तिथे यूट्यूबरने त्यांच्या उत्सवात सहभाग घेतला. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत.