Digestion Time of Apple vs Samosa: वरून लालेलाल आणि आतून पांढरं असलेलं गोड फळ सफरचंद खाणं जवळपास सगळ्यांनाच आवडतं. हे टेस्टी फळ पोषक तत्वांचा खजिना मानलं जातं. ज्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. सफरचंद खाऊन पोट हलकं वाटू लागतं, पण सफरचंदाच्या तुलनेत समोसा खाल्ल्यावर पोट जड वाटू लागतं. हे तर आपल्याला माहीत असेलच की, आपण खातो ते वेगवेगळे पदार्थ पचायला वेगळी वेगवेगळा लागतो. अशात आज आपण सफरचंद आणि समोसा पचनासाठी लागणाऱ्या वेळातील फरक आणि त्याची कारणं समजून घेणार आहोत.
सफरचंद आणि समोसा पचनातील मोठा फरक!
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, सफरचंद आणि समोसा पचायला लागणाऱ्या वेळेमध्ये खूप मोठा फरक असतो. याचं कारण म्हणजे दोन्हींची संरचना आणि पोषक तत्वं.सफरचंदामध्ये पाण्याचं प्रमाण आणि फायबर भरपूर असतं, त्यामुळे ते पोटात सहजपणे पचतं. एका सफरचंदाला पूर्णपणे पचायला साधारण ३० मिनिटं ते १ तास इतका वेळ लागतो.
दुसरीकडे समोसा हा तळलेला, तेलकट आणि जड पदार्थ असतो. त्यामुळे शरीराला तो पचवायला खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे समोसा पचायला साधारण ४ ते ६ तास किंवा काही वेळा त्याहून अधिक वेळ लागतो.
सफरचंद का पचतं पटकन?
सफरचंदात फायबर, पाणी आणि नॅचरल शुगर असते, जी सहजपणे पचते. यात कमी कॅलरी असते आणि ते शरीराला ताजेपणा देते. सफरचंदातील फायबर पचनतंत्र स्वच्छ ठेवतं आणि अन्न लवकर पचवायला मदत करतं. तसेच त्यात असलेले व्हिटामिन्स आणि एंझाइम्स अन्नाचे सूक्ष्म विभाजन करून एनर्जीमध्ये रूपांतर करतात. म्हणूनच सफरचंद खाल्ल्यानंतर काही तासांतच पुन्हा भूक लागते.
समोसा पचायला वेळ का लागतो?
समोसा हा कार्बोहायड्रेट, तेल आणि मसाल्यांनी भरलेला पदार्थ आहे. तळलेले पदार्थ पचायला जास्त वेळ घेतात कारण त्यात फॅटचं प्रमाण खूप जास्त असतं. हे फॅट पोटात बराच वेळ राहतं आणि पचन एंझाइम्सना ते तोडायला जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे शरीराची पचनक्रिया बरीच स्लो होते. अशात गॅस, अपचन आणि पोटात जडपणा अशा समस्या होतात.
पचनाचा स्पीड कशावर अवलंबून असतो?
पचनाची गती व्यक्तीचं वय, आरोग्य आणि लाइफस्टाइलवर अवलंबून असते. तरूण आणि निरोगी व्यक्तीचं पचन लवकर होतं, पण ज्यांना पचनाशी संबंधित त्रास आहे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांचं पचन हळू चालतं.
एकंदर काय तर चांगल्या पचनासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे. फळं, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ पचन सुधारतात, तर तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळल्यास पचन तंत्र निरोगी राहतं.
Web Summary : Apples digest quickly (30 mins-1 hour) due to fiber and water content. Samosas, fried and fatty, take 4-6 hours or longer. Digestion speed depends on age, health and lifestyle. Balance diet is key.
Web Summary : सेब फाइबर और पानी की मात्रा के कारण जल्दी (30 मिनट-1 घंटा) पच जाते हैं। समोसे, तले हुए और वसायुक्त, 4-6 घंटे या उससे अधिक समय लेते हैं। पाचन गति उम्र, स्वास्थ्य और जीवनशैली पर निर्भर करती है। संतुलित आहार महत्वपूर्ण है।