शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

मुंग्यांनी विमानाचे उड्डाण रोखले, दिल्ली विमानतळावर अजबच नाट्य रंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 19:09 IST

Air India Plane: एअर इंडियाचे (एआय-१११) फ्लाईट सोमवारी दिल्ली एअरपोर्टवरून लंडनसाठी उड्डाण करणार होते. तेवढ्यात विमानातील बिझनेस क्लासमध्ये मुंग्यांची रांग लागेली दिसून आले. त्यामुळे विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले.

नवी दिल्ली - तांत्रिक अडथळ्यांमुळे विमानांचे उड्डाण रोखण्यात आल्याच्या अनेक घटना तुमच्या वाचनात आल्या असतील. मात्र आज दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे अजबच नाट्य रंगले. येथे एअर इंडियाचे (एआय-१११) फ्लाईट सोमवारी दिल्ली एअरपोर्टवरून लंडनसाठी उड्डाण करणार होते. तेवढ्यात विमानातील बिझनेस क्लासमध्ये मुंग्यांची रांग लागेली दिसून आले. त्यामुळे विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले. (The ants stopped the flight of the plane, there was a strange drama at the Delhi airport)

एअर इंडियाचे हे विमान सोमवारी दिल्लीमधून लंडणसाठी उड्डाण करणार होते. मात्र त्याचवेळी विमानातील बिझनेस क्लासमध्ये मुंग्या दिसून आल्या. मुंग्यांनी अनाहूतपणे थेट विमानात प्रवेश मिळवल्याने विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले. त्यानंतर विमानातील प्रवाशांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या विमानामधून भूतानचे राजकुमारसुद्धा प्रवास करत होते. अखेर प्रवाशांना कुठलाही त्रा होऊ नये यासाठी विमान बदलून दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.

तत्पूर्वी सौदी अरेबियासाठी उड्डाण करणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एका विमानाच्या काचेमध्ये तडा गेल्याचे दिसून आल्यानंतर हे विमान आणीबाणीच्या परिस्थितीत तिरुवनंतपुरम विमान तळावर उतरवण्यात आले. विमानाने उड्डाण केल्यानंतर तासाभरातच  हे विमान माघारी बोलावण्यात आले होते.

कोरोनाबाबतच्या निर्बंधांमुळे या विमानामध्ये कुणी प्रवासी नव्हते. तर हे विमान माल वाहतूक करत होते. विमानामध्ये चालक दलाचे एकूण आठ सदस्य होते.    

टॅग्स :airplaneविमानAir Indiaएअर इंडियाJara hatkeजरा हटके