झोपेत हा प्राणी बदलतो रंग, Video पाहून तुम्हीही व्हाल चकित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:06 IST2021-08-24T19:04:08+5:302021-08-24T19:06:55+5:30
Social Viral: या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

झोपेत हा प्राणी बदलतो रंग, Video पाहून तुम्हीही व्हाल चकित
ऑक्टोपस झोपेत रंग बदलत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ Buitengebieden नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. झोपलेल्या ऑक्टोपसचा रंग बदलतानाचा हा व्हिडिओ पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये झोपलेला ऑक्टोपस दाखवला आहे. हा झोपेत असताना त्याचा रंग बदलत आहे. या व्हिडिओनं अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे. व्हिडिओत हा ऑक्टोपस फक्त रंगच नाही तर त्याचा आकारही बदलताना दिसत आहे.
An octopus changing colors in her sleep.. pic.twitter.com/eJZyThfg0I
— Buitengebieden (@buitengebieden_) August 21, 2021
लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत असून, लोक खूप आनंदी होत आहेत. "तो झोपेत स्वप्न पाहत असेल." "मला माहित नव्हतं की ऑक्टोपस स्पाइक्स बनवू शकतात. सुंदर.", अशा विविध कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.