बाईकवर समोर बसली होती बायको अन् मागे ३७ खुर्च्या; फोटो पाहून आनंद महिंद्राही आश्चर्यचकित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 20:19 IST2022-04-03T20:18:42+5:302022-04-03T20:19:48+5:30
Anand Mahindra Latest Tweet: महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी रविवारी आणखी एक हटके फोटो शेअर केला. युजर्स या फोटोबद्दल उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

बाईकवर समोर बसली होती बायको अन् मागे ३७ खुर्च्या; फोटो पाहून आनंद महिंद्राही आश्चर्यचकित!
Mahindra Group चे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी रविवारी एक हटके ट्विट केलं. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मोपेडवर एक व्यक्ती सुमारे ३७ खुर्च्या, अनेक चटई आणि त्याच्या पत्नीला घेऊन जात असल्याचं दिसतं. आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा फोटो व्हायरल झाला आहे. या ट्विटवर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत.
"आता आपल्याला लक्षात येईल की भारत जगात सर्वाधिक दुचाकी का बनवतो. आम्ही टू-व्हिलरची इंच इंच जागा कशी जास्तीत जास्त उपयोगात आणायची आणि जास्त माल कसा न्यायचा याची आम्हाला चांगली माहिती आहे. आम्ही असेच आहोत", असं आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये नमदू केलं आहे.
Now you know why India makes the most two-wheelers in the world. We know how to carry the highest volume of cargo per square inch of wheel…We are like that only… #Sundaypic.twitter.com/3A0tHk6IoM
— anand mahindra (@anandmahindra) April 3, 2022
यूझर्सचा इंटरेस्टिंग रिप्लाय
महिंद्राच्या या पोस्टवर एका यूजरनं म्हटलं की, "त्यानं (मोपेड चालक) दोन्ही खुर्च्यांचा वरचा भाग रिकामा का ठेवला?". तर आणखी एका युझरनं परेड दरम्यान मोटारसायकलवर अप्रतिम कामगिरी करत असलेल्या जवानांचं छायाचित्र पोस्ट केलं आणि लिहिलं, "हे अतुल्य भारताचे सौंदर्य किंवा प्रतिभा आहे सर..."
आनंद महिंद्रा यांनी एका युजरचं ट्विट रिट्विट केलं आहे ज्यानं मोटारसायकलवर सैनिक साहसी कर्तब दाखवत असल्याचं छायाचित्र पोस्ट केलं आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक ट्विट रिट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एका ट्विटर युजरनं, "हे प्रेमाचं प्रतिक आहे" असं लिहिलं आहे.